मुख्य सामग्रीवर वगळा



जय हिंद की सेना'                          'ऑपरेशन सिंदूर' 

       लेखक- संभाजी बबनराव गायके
                  पुणे, 9881298260


     भारतीय सैन्याचे तमाम देशप्रेमी नागरिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. 'जय हिंद की सेना' म्हणायला वाव असणारा, काश्मिरात गेलेल्या पर्यटकांना मृत्यूचा सामना करायला लावणाऱ्या अतिरेक्यांच्या आश्रयदात्यांवर यशस्वीरीत्या 'ऑपरेशन सिंदूर' करून, ज्यांच्या सिंदूर वर (कुंकवावर) घाला घातला होता. त्यांचा अंशतः का होईना, बदला घेण्यात भारतीय सैन्य यशस्वी झाले आहेत.  सरकार, सैन्य काही का करीत नाही हे विचारणाऱ्यांना सैन्याने उत्तर दिले आहे. त्यासाठी योग्य वेळ यावी लागते, फक्त मागील सर्जिकल स्ट्राईक सारखं सैनिकांकडून पुरावे मागत बसू नये, म्हणजे मिळवली. तसं यावेळी पाकिस्तान दूरदर्शन वाहीन्यांवरच आपला पराक्रम दाखवला जात असल्याने विरोधकांची ही संधी मात्र हुकली आहे. 
       आता ही फक्त सुरुवात आहे व याला पाकिस्तान ने उत्तर द्यावे म्हणजे पुढची खेळी भारताला खेळता येईल.  आणि त्याने उत्तर दिले नाही, तर जगभरात त्याची 'छी थू' तर होणारच आहे. ती अशीही होतच रहाते, असो. या दरम्यान ज्या घटना घडत आहेत त्यामुळे सर्व देशप्रेमी नागरिकांनी सजग रहाणे गरजेचे आहे कारण शत्रू फक्त सीमेबाहेरच आहे असं नाही तर आत ही डूख धरून बसला आहे. अगदीच काही नाही तर आपली तरी सुरक्षा स्वतः करायला तयार रहा व सैनिक आत, बाहेर दोन्ही कडून आपलं रक्षण करतील असा दुहेरी ताण त्यांच्यावर टाकू नका. 
       काही दिवस पर्यटन, देवदर्शन नाही केलं तर आपले देव काही नाराज होणार नाहीत, समजून घेतील पण त्यांना मात्र पोटावर पाय पडला तर त्यांचे देव आठवतील. असो. त्यांचे ते पाहून घेतील, आपण आपलं पाहू या व सुरक्षित राहू या. एकमेकांची काळजी घ्या व अवघे धरा सुपंथ. 

      ते सैनिक किंवा पोलिस घालतात तशा गणवेशात आले होते... आणि त्यांनी निष्पाप पर्यटकांना ठार मारले... बचावलेले पर्यटक जीव मुठीत घेऊन तिथून पळू लागले.. काही वेळाने त्यांच्याजवळ सैनिकी गणवेशात असलेले आणि शस्त्रे असलेले काही लोक पोहोचले... बचावलेल्या लोकांना आपलाही मृत्यू जवळ आल्याचे दिसू लागले... आमच्या माणसांना मारले... आता आम्हांलाही मारून टाका... असं अगदी हताश, असाहाय्य स्वरात त्यातील काही स्त्रिया म्हणू लागल्या... लहान मुलं तर अत्यंत भेदरलेली होती.... 
        आलेल्या सैनिकांमधील एका ज्येष्ठ सैनिकाच्या दोन वाक्यांनी या लोकांच्या जीवात जीव आला.... हम फौज हैं... हम Indian Army है... आपकी सुरक्षा के लिये आये हैं... आप Tension मत लो!' हे शब्द ऐकल्यानंतरही ही माणसं काही क्षण अविश्वासाने नुसती पहात राहिली.. धापा टाकीत, रडत राहिली.. सैनिकांनी या लोकांना पिण्याचे पाणी दिले... लहान मुलांना जवळ घेतले... आणि त्यांच्या भोवती सुरक्षेचे कडे करून ते उभे राहिले... काहीवेळाने त्या सर्वांची सुरक्षित ठिकाणी रवानगी करण्यात आली!
        या हल्ल्यात २६ बळी घेतले गेले... आणि सबंध भारतात शोकाचा आगडोंब उसळला... जे अगदी साहजिकच आहे.   
      भारतीय सैन्याने गेली साडेसात दशके देशाचं tension अंगाखांद्यावर बाळगलेलं आहे... १९६२, १९६५, १९७१, १९९९ ही चार घोषित युद्धं, श्रीलंकेला पाठवली गेलेली शांतिसेना, यांतून हजारो सैनिकांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली आहेच... पण तितकाच त्याग देशांतर्गत शांतता राखण्यासाठीही केला आहे, हे ध्यानात घ्यावे असे आहे. 
       एकट्या काश्मिरात १९४७ पासून २०२५ पर्यंत बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. हे सैनिक जर आज हयात असते तर आपल्या सीमा आणखीन बळकट झाल्या असत्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या सहवासाचा अधिक काळ आनंद घेतला असता! 
      काश्मिरात भारतीय सैनिकांविषयी रागाची भावना आहे, तेथे त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक देतात. अतिरेकीही त्यांनाच लक्ष्य करतात आणि संधी मिळताच त्यांना ठार केले जाते. पर्यटकांना ते काही म्हणजे काहीच करीत नाहीत. खुशाल काश्मीरच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यायला जा.... असाच विचार गेली काही वर्षे केला जात आहे. 
        पहलगाम मध्ये बळी पडलेली ही सव्वीस माणसं आपली. मग सैनिक कुणाचे आहेत? ते कुणासाठी मरण पत्करताहेत? का ते हातात रायफल असूनही त्यांच्या अंगावर येणाऱ्या स्थानिकांच्या शिव्या खाताहेत, दगड झेलत आहेत? याचा विचार भारतीय जनता अगदी अभावानेच करताना दिसते!
       फारच मोठा हल्ला झाला आणि त्यात जास्त संख्येने सैनिक बळी गेले तरच जनमानसात मोठी खळबळ उडते. एखाद दुसरा बळी गेला की त्याची एक साधी बातमी बनते. मृत सैनिकाचे गाव, त्याचे जवळचे नातलग, यांच्यापुरतेच हे दु:ख मर्यादित राहते. 'अमर रहे' म्हणाले की, स्मारक बांधले की कर्तव्य संपले!
      एक सैनिक हा हजारो नागरिकांच्या जीवनाचा रक्षक असतो आणि म्हणूनच त्याचे प्राण महत्वाचे असतात. आणि जेंव्हा त्याचाच बळी जातो तेंव्हा नागरिकांतून शोकासंतप्त प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित आणि गरजेचे असते.
      इस्रायल नावाच्या एका छोट्या देशाचे उदाहरण हल्ली सर्वांना ज्ञात आहे. पण त्यांच्या पावलावर पाऊल टाकायला अजून कुणात हिम्मत आलेली दिसत नाही! त्यांनी सव्वीस मारले म्हणून आपण त्यांचे बावन्न मारावेत, असेही नागरिक म्हणतात. या हिशेबाने तर आजवर हा आकडा काही हजारांच्या वर गेला असता! 
       काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, त्यावर आपली सत्ता आहे. तिथे आपली वहिवाट असावी म्हणून तिथे पर्यटकांनी मोठ्या संख्येने जावे म्हणजे तिथली परिस्थिती भारताला अनुकूल होईल.. असाही एक मतप्रवाह आहे... आणि त्याचेच फलित म्हणजे कश्मिरात वर्षागणिक वाढत गेलेली पर्यटकसंख्या, आणि अर्थातच त्यांना मिळालेला भरमसाठ पैसा. यातून काही भाग, पैसा अतिरेकी कारवायांना जात असणार अशी शंका आहे. 
       पहलगामच्या हल्ल्यानंतर बहुसंख्य पर्यटक परत निघून आले आणि ज्यांनी आरक्षण केले होते त्यांनी ते रद्द केले. असे होणे ही पहिली प्रतिक्रिया. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिथे राहिलेल्या काही पर्यटकांचा एक विडीओ दिसतो त्यात एक महिला म्हणते... 'छोटी बाते तो होती रहती हैं!'
      फेसबुकवरील एका प्रतिक्रियेत एक महिला म्हणते की 'बळी गेलेला नौदल अधिकारी तर प्रशिक्षित होता.. त्याने प्रतिकार का नाही केला?'
      अतिरेक्यांनी हिंदू असेल त्यालाच मारले (आणि त्यांच्या कामात मध्ये आला त्याचा धर्म पाहिला नाही) आणि हे मेलेल्यांच्या आप्तांनी तिथेच लगेच सांगितले आणि ते रेकॉर्ड झाले... हे भारतीयांचे नशीब. अन्यथा 'असे झालेच नाही' असे म्हणायला पाकिस्तानी आणि आपलेही लोक मोकळे झाले असते. 
        हा हल्ला सत्ताधारी पक्षाने पुढे येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घडवून आणला आहे... असा दावा करणाऱ्या भारतीय लोकांना या हल्ल्यात बळी गेलेल्या लोकांच्या आत्म्यांनीच बघून घ्यावे... जिवंत माणसांना हे शक्य होणार नाही! 
       काहीही झाले तरी लष्कराने येऊन लोकांना वाचवावे असे जणू लोकांनी ठरवून ठेवले आहे, पण लष्कराच्या बाजूने कोण कोण उभं आहे... आणि हे उभं राहणं केवळ घोषणा देणं नसतं हे ही लक्षात घ्यावे.   
        आजचीच बातमी आहे.... बुकींग केलेले वाया जाऊ नये म्हणून अनेक लोक काश्मिरात दाखल झालेले आहेत... आणि स्वर्गाचा आनंद लुटू पहात आहेत! एवढी निर्लज्ज माणसं जगाच्या पाठीवर कुठे नसतील! आणि या तिथे मौजेसाठी गेलेल्या लोकांना लष्कराने संरक्षण द्यावे, अशी त्यांची इच्छा आहे. 
       काश्मीर मध्ये पर्यटन हा एक फार मोठा व्यवसाय आहे... त्यांच्यासाठी पर्यटक देव असतीलही... मग त्यांना कुठलेही देव चालतील.. फक्त यांनी पैसे दिले पाहिजेत. पहलगाम हल्ल्यानंतरही तिथे जाणाऱ्या लोकांची मानसिकता अनाकलनीय आहे. असो. यावर कोण काय करणार?
       कोणत्याही समाजघटकाला या जगाच्या गदारोळात टिकून राहायचे असेल तर एकी हेच बळ. हे पक्ष्यांना समजते... आपल्या पक्षांना कधी समजणार?
       पहलगाम हल्ला झाल्यानंतर सर्व पर्यटक परतले असते तर एक मोठा निषेध नोंदवला गेला नसता का? या पर्यटकांच्या परत जाण्याने तेथील व्यावसायिक कायमचे उपाशी मेले नसते! आणि त्यांनी या आधी गेली कित्येक महिने प्रचंड कमावले होतेच की! त्यांनाही थोडी कळ लागू दिली असती तर काय बिघडले असते?
       क्रियेला काय प्रतिक्रिया येते त्यावर अनेक बाबी अवलंबून असतात! एक राष्ट्र म्हणून, एक समाज घटक म्हणून आपण एकमुखी प्रतिक्रिया द्यायला पाहिजे होती. असे जोवर होत नाही तोवर....‌ पहलगाम सारखी अनेक ठिकाणे तिथे आहेत, देशात आहेत. सैनिक त्यांच्या कर्तव्यावर आहेत. ते म्हणत राहतील... हम INDIAN ARMY है.... tension मत लो! आणि आपले लोक त्यांना TENSION देत राहतील!
(योग्य वाटल्यास सामायिक करतांना लघुलेखात कुठलाही बदल न करता मुळ लेखकाच्या नावासहच सामायिक करा ही विनंती.)


   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...