• 140 नाल्यांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी झालीच पाहिजे
• आमदार रणधीर सावरकरांचे मनपाला निर्देश
अकोला :
अकोला शहरातील मोठे सत्तावीस नाले, तसेच हद्दवाढ क्षेत्रासह शहरातील 140 नाल्यांची साफसफाई अभियान पूर्णपणे सहा जूनच्या आधी करा, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी मनपा आयुक्त सुनील लहाने यांना दिले.
अकोला शहरामध्ये उमरी, बारा ज्योतिर्लिंग परिसर, रेणुका नगर डाबकी रोड, कृषी नगर, गीतानगर, शिवसेना वसाहत, अशा अनेक भागांमध्ये पावसाळ्यामध्ये घरामध्ये पाणी शिरण्याचे प्रकार होतात. त्याकडे कटाक्षाने लक्ष देऊन मनपाद्वारे साफसफाई अभियान सुरू असले, तरी याकडे प्राधान्याने आयुक्तांनी लक्ष द्यावे. ज्या भागांमध्ये असा प्रकार होतो, त्या भागामध्ये प्राथमिकता देणे, लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगून अनेक ठिकाणी मनपाने नाल्यांची रुंदी मोठी केली असली तरी त्याची साफसफाई करणे गरजेचे आहे.
रिगल टॉकीज, शालिनी टॉकीज, चित्रा टॉकीज, पोळा चौक, तसेच शहरातील सांडपाणी मोर्णा नदीमध्ये जोडल्या जातात. त्या भागामध्ये त्या नाल्यांची साफसफाई मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. त्या भागातल्या नदीकाठी सुद्धा साफसफाई करून पाणी अडणार नाही व पाण्यामुळे त्या भागातील नागरिकांना धोका होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना आमदार रणधीर सावरकर यांनी केल्यात. शहरातील पाणी शिरणाऱ्या भागाची आतापासून नोंदणी करून त्या भागासाठी उपाय योजना अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसान वाचविण्यासाठी व नागरिकांना त्रास होणार नाही, या दृष्टीने मनपा प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, अशा सूचना आमदार सावरकर यांनी देऊन 140 नाल्यांची साफसफाई संदर्भात कारवाई सुरू असताना त्याची व्यवस्थित काम व्हावे. केवळ देखावा न करता प्रत्यक्षात काम करण्यात यावे. अशा सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या आहेत.
यासंदर्भात आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेऊन साफसफाई अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यात येईल असे अभिवचन दिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा