मुख्य सामग्रीवर वगळा

 


बंडू खंडागळे गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्था अध्यक्षपदी बिनविरोध



मुंबई : 

गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेच्या आज रविवार- दिनांक 11 मे 2025 रोजी रायगड जिल्ह्यातील पेन सावरसई येथील गोवा व्हीला अँड रिसॉर्ट- पि.के बँकेट हॉल शेने- सावरसई येथे झालेल्या संस्थेच्या कार्यकारणी सर्वसाधारण सभेत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष-बंडू विरेश्वर खंडागळे यांची एक मताने एक मुखाने पुन्हा एकदा 2025 ते 2029 पाच वर्ष कालावधी करिता सर्व सदस्य यांची सभागृहामध्ये हात वरती करून एकतर्फी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. 


        आज या सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने सभेच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन त्याच बरोबर श्री गणेश गणपती बाप्पा, श्री महादेव, छत्रपती शिवाजी महाराज, संत काशिबा महाराज, देव देवतांचे पूजन प्रतिमेस पुष्पहार घालून सभेला सुरुवात झाली. यावेळी समाज बांधवांचे आज पर्यंत निधन झालेले गुरव समाज बांधव, त्याचबरोबर सध्या भारत पाकिस्तान युद्ध सुरू असल्याने देशाच्या हिंदुस्थानाच्या सीमेवर आजपर्यंत ज्यांना वीरमरण आले आणि शहीद झालेल्या आपल्या वीर सैनिकांसाठी तसेच संस्थेचे विद्यमान खजिनदार कै भाऊ शंकर दळवी यांचे नुकतेच निधन झाले. यांच्यासाठी संपूर्ण कार्यकारी मंडळाने सभागृहात दोन मिनिट उभे राहून श्रद्धांजली दिली. यानंतर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष यांनी प्रोसिडिंग त्याचबरोबर आजपर्यंतचा जमाखर्च वाचन करून सर्व कार्यकारी मंडळांनी त्याला हात वरती करून एक मुखाने मान्यता दिली. 



    प्रोसिडिंग आणि जमा खर्च मंजूर केले. या सर्वसाधारण बैठकीच्या निमित्ताने कामकाज सुरू असताना आज पर्यंत नियोजित समाज मंदिर जागा खरेदीसाठी ज्या सदस्य यांनी अद्याप पर्यंत संस्थेकडे आपली देणगी ठरावाप्रमाणे जमा केली नाही. याची माहिती संस्थेच्या वतीने अध्यक्ष यांनी सभागृहात मांडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष- बंडू खंडागळे, त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी- विशाल गुरव, विजय ठोसर, अमोल गुरव, बबन गुरव, रमेश गुरव, सुरेश गुरव, रुपेश गुरव, योगेश गुरव, रमेश [बुवा] गुरव, अण्णा बिराजदार गुरव, विनायक ढवळे, सौ अमृता काळे, यांनी आपापल्या माध्यमातून समाजाविषयी आपापली व्यक्तिगत मते मांडून उपस्थित समाज बांधव कार्यकारी मंडळाला मार्गदर्शन केले. या सर्वसाधारण बैठकीसाठी पेन येथील अनेक समाज बांधव स्थानिक यावेळी उपस्थित होते. या सर्वसाधारण बैठकीत समाजातील समाज बांधवांचे काही कौटुंबिक, वैवाहिक, आर्थिक, व्यावसायिक प्रश्न, संस्थेचे अध्यक्ष- बंडू खंडागळे यांनी संस्थेच्या बैठकीच्या कामकाजामध्ये अधिकृत संस्थेच्या पटलावर घेऊन त्याबाबतीमध्ये कार्यकारी मंडळासमोर दोन्ही समाज बांधवांना सामोरे घेऊन व्यक्तिगत मध्यस्थीची भूमिका भूमिका मांडून मार्गदर्शन केले. यावेळी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय गुरव समाज महासंघाच्या संभाजीनगर येथील सर्वसाधारण बैठकीतील संपूर्ण महाराष्ट्रातील गुरव समाज बांधवांसाठी नव्याने सॉफ्टवेअर- ॲप्स तयार झाला असल्याने त्या बाबतीत गुरव बांधवांचे संघटन करण्यासाठी आणि राज्यातील गुरव समाजाची संख्या किती आहे. हे समजण्यासाठी त्याचा फायदा समाज बांधवांना कसा होईल. त्याच बरोबर श्री संत काशिबा महाराज आर्थिक विकास युवा महामंडळ आणि राज्य सरकारकडे प्रलंबित असलेला देवस्थान अधिनियम विश्वस्त कायदा 1950 या बाबतीमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून विधेयक दुरुस्ती करण्याबाबत संस्थेचे अध्यक्ष यांनी यावेळी उपस्थित सभागृहामध्ये सर्वांना मार्गदर्शन केले. या बैठकीच्या निमित्ताने गोवा व्हीला रिसॉर्टचे प्रोप्रा-हरेश विरेश्वर खंडागळे आणि कुटुंबीयांकडून सर्व कार्यकारी मंडळासाठी विशेष भोजन व्यवस्था केली होती. या बैठकीसाठी संस्थेचे मार्गदर्शक माननीय दत्ताजीराव मसुरकर यांच्याकडे कुटुंबामध्ये दुःखद घटना घडली. असल्याने ते सर्वसाधारण बैठकीसाठी उपस्थित नव्हते. यावेळी गुरव समाज रायगड ठाणे मुंबई संस्थेचे पदाधिकारी अध्यक्ष-बंडू खंडागळे, विजय साळुंके, सुरेश गुरव, रमेश (काका) राजगुरव, रमेश गुरव, सौ रुणाली गुरव, श्रीमती मंदा गुरव, संजय मोरे, रुपेश गुरव, रमेश (बुवा) गुरव, संदीप खंडागळे, रवींद्र गुरव, सचिन गुरव, प्रभाकर भालेराव, सुरेश दळवी, राजेंद्र निळकंठ, रामचंद्र गुरव, विनायक ढवळे, योगेश गुरव, प्रदीप बागुल, संजय गुरव, रमेश खंडागळे, विशाल गुरव, समीर गुरव, देविदास गुरव, नंदकुमार गुरव, हरेश खंडागळे, अमोल गुरव, विजय ठोसर, सौ अमृता ढवळे, भगवान गणेशकर, त्याचबरोबर स्थानिक समाज बांधव- यशवंत गुरव, अरुण गुरव, राजेंद्र गुरव, सौ लता गुरव, श्रीमती वासंती देवकर, अण्णा बिराजदार, वसंत गुरव, अभिजीत गुरव, प्रवीण गुरव, प्रशांत ढवळे, अजित अहिर, अमोल ढवळे, मनोहर अहिर, याप्रमाणे अनेक समाज बांधव उपस्थित होते. राष्ट्रगीता नंतर सर्वसाधारण बैठकीची सांगता झाली.

    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...