खंडेलवाल इंग्लिश हायस्कुलचा 100 टक्के निकाल
शाळेतून प्रथम येण्याचा बहूमान वैभव अजय देवकतेने पटकावला
अकोला :
जुनेशहरातील प्रख्यात खंडेलवाल इंग्लिश हायस्कुल, अकोलाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
एकुण 91 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 91 विद्यार्थीही उतीर्ण होवून 100 टक्के निकाल लागला आहे. शाळेतून प्रथम येण्याचा बहूमान वैभव अजय देवकते या विद्यार्थ्याने पटकावला आहे. त्याला 97.40 टक्के गुण प्राप्त झाले आहेत.
द्वितीय आस्था भास्कर साबळे हिने 97.20, तृतीय समिक्षा विनोद गुजर हिने 96.80 टक्के, चतूर्थ पार्थ सुमित निमकंडे याने 96.20 टक्के, तर श्रेया सुनील भिरड हिने 95.80 टक्के गुण पटकावून पाचवे स्थान मिळविले.
संचालक मंडळाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आहे. शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा ताराताई हातवळणे, सचिव गोपालजी खंडेलवाल व कोषाध्यक्ष नाना कुळकर्णी यांनी अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा