डवले कॉलेजच्या मेरिट विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जल्लोषात
अकोला : स्थानिक डवले कॉलेज, मोठी उमरी अकोला, जवाहर नगर अकोला येथे इयत्ता 10 वी /12वी च्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2025 च्या बोर्ड परीक्षेत अमरावती विभागात मेरिट येण्याचा बहुमान पटकावला आहे. डवले कॉलेजचा विद्यार्थी साई संतोष इंगळे यांनी 12 वी विज्ञान शाखेत 92.83% गुण घेऊन अमरावती बोर्डात प्रथम मेरिट आला आहे. तसेच बारावी विज्ञान शाखेत रिया खारोडे 91.50% गुण घेऊन बोर्डात मुलींमधून प्रथम आली आहे कॉमर्स इंग्रजी माध्यमात 91.50% गुण घेऊन समृद्धी देशपांडे मेरिट आली आहे. तसेच वर्ग दहावीच्या परीक्षेत स्वरित दावेदार 97% गुण घेऊन मिरीट आला आहे, तसेच डवले कॉलेजच्या 100 च्या वर विद्यार्थ्यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त केली आहे,याबद्दल डवले एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यालय जेव्हा नगर अकोला येथे सर्व विद्यार्थ्यांचे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी डॉ. सुचिताताई पाटेकर शिक्षणाधिकारी (माध्य.)जिल्हा परिषद अकोला, मा. प्रमोद टेकाळे शिक्षण सहाय्यक निरीक्षक जिल्हा परिषद (माध्य.) अकोला, प्रा. नरेंद्र लखाडे शिक्षक सेना, प्रा. विजय ठोकळ वि.मा.शी., डॉ. साबीर कलाम उर्दू संघटना हे होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश डवले सर यांनी केले. त्यांनी 2008 पासून सातत्याने 16 वर्षात डवले कॉलेज निकालात अग्रस्थानी आहे असे सांगितले. फेब्रुवारी 2024 च्या परीक्षेत अथर्व भूतडा बोर्डातून प्रथम मिरीट, कु. अनुभा राठी 600 पैकी 600 गुण घेऊन महाराष्ट्रात प्रथम आली याचा अभिमान असल्याचे सांगितले. या प्रसंगी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या हस्ते विविध विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी डवले कॉलेजच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले. तसेच याची डवले एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित स्कूल कॉलेजेसच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच महाराष्ट्रात सातत्याने निकालाबाबत कॉलेज अग्रस्थानी असल्यामुळे समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मा. प्रमोद टेकाळे यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला. प्रा नरेंद्र लखाडे यांनी असे प्रतिपादन केले की" ज्याप्रमाणे विषाची परीक्षा केली जाऊ शकत नाही अगदी त्याचप्रमाणे डवले कॉलेजच्या यशाची परीक्षा केली जाऊ शकत नाही, प्रा प्रकाश डवले सर सचिव सौ मृणाली डवले संचालक डॉ. अभिजीत डवले व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी यांचे नियमित परिश्रम टेस्ट सिरीज प्रत्येक विषयाकडे वैयक्तिक लक्ष यामुळे विद्यार्थी बोर्डात अव्वल निकाल देत आहेत असे" प्रतिपादन केले. प्रा विजय ठोकळ यांनी" डवले कॉलेजमुळे अकोल्याचे नाव महाराष्ट्रात गाजत आहे असे प्रतिपादन केले याप्रसंगी बोर्डातून प्रथम आलेल्या साई संतोष इंगळे या विद्यार्थ्याने बोर्डाचा सुद्धा अभ्यास डवले कॉलेज करून घेत असल्या मुळे मला हे यश प्राप्त झाले आहे" असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन उपप्राचार्य वैशाली निवाने यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. कविता बलिंगे, प्रा. प्राची गिन्मिने, प्रा. श्वेता तायडे, प्रा. पारिजात पुनसे, प्रा. दिपाली चिकटे, प्रा. वरूची खेळकर, प्रा श्रद्धा देशपांडे, प्रा रजनी पांडे, प्रा स्वाती बोरोडे, प्रा. इतिका दुबे, सागर लोखंडे,श्याम सुलताने, किशोर सरगे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम स्थळी असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी पालक वर्ग उपस्थित होता संपूर्ण अकोला डवले कॉलेज क्रमांक 1 वर आल्यामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा