मुख्य सामग्रीवर वगळा

 



“प्रभावाखाली नाही, प्रकाशाखाली या” – स्वामी श्रीकंठानंद यांचे पत्रकारांना मार्गदर्शन

व्हॉईस ऑफ मीडियाच्या पहिल्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनचे थाटात उद्घाटन


नाशिक (प्रतिनिधी)– “प्रभावाखाली न राहता प्रकाशाखाली यायला हवं,” अशा मर्मदर्शी आणि प्रेरणादायी शब्दांत स्वामी श्रीकंठानंद यांनी महिला पत्रकारांना विचारांची दिशा दिली. व्हॉईस ऑफ मीडिया व व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. हे अधिवेशन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

स्वामीजींनी आपल्या भाषणात सांगितले की, “महिलांनी आपली ओळख सामान्यत्वात शोधली पाहिजे. ‘मी जशी आहे, तशी मी अनुभवायला आले आहे’ हा आत्मस्वीकार महत्त्वाचा आहे. आपण सर्वज्ञ नाही, हे मान्य करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आत्मबळ निर्माण करणं.” त्यांनी साधेपणाचा पुरस्कार करताना असेही म्हटले की, “साधेपणा असेल, तर मंदिरात जाण्याची गरज भासत नाही. खऱ्या अर्थाने आध्यात्मिकतेचा प्रकाश आपल्या कृतीतून दिसावा लागतो.”

पत्रकारितेच्या भूमिकेबाबत ते म्हणाले की, “आज चार अँकरपैकी तीन महिला आहेत, ही स्थिती महिलांच्या प्रगतीचे द्योतक आहे. पण ही संधी उपयोगी ठरवण्यासाठी महिलांनी ‘आपण ही भूमिका कशी पार पाडणार?’ याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. सकाळ-संध्याकाळ स्वतःवर काम करणं, आत्ममंथन करणं आवश्यक आहे. स्त्रियांच्या वाट्याला येणाऱ्या टीका-टिप्पण्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. “स्वतःला सहनशील बनवलं, तर कोणताही त्रास त्रास वाटत नाही,” असं सांगत त्यांनी मानसिक सामर्थ्य वाढवण्यावर भर दिला. “बुद्धिमत्ता पुरेशी नाही, ती हृदयवाणी झाली पाहिजे. विचार मोठा असावा आणि मानसिक आहार सकस असावा. रोज ध्यान करा, स्वतःसाठी वेळ ठेवा. अहंकार दूर होतो आणि आपण व्यापक होतो,” हे त्यांच्या विचारांचे सार होते.


दुर्गाताई तांबे यांचा अनुभवसंपन्न सल्ला


यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्षा मा. दुर्गाताई तांबे यांनीही आपले विचार मांडले. त्यांनी सांगितले की, “पूर्वी महिला पत्रकार होणं हे फार मोठं आव्हान होतं. पण आज परिस्थिती बदलली आहे. महिलांनी आपली जागा निर्माण केली आहे. घटनेने महिलांना संधी दिली, तर घरच्या पाठिंब्यामुळे त्या त्या संधीचा पुरेपूर उपयोग करू शकतात.”

दुर्गाताईंनी भारतातील यशस्वी महिला पत्रकारांचा अभ्यास करण्याचा सल्ला देत नवोदित महिला पत्रकारांना योग्य दिशा दाखवण्याचे आवाहन केले.या भव्य उद्घाटन सोहळ्यास दुर्गाताई तांबे, मोनिका राऊत पोलीस उपायुक्त, नाशिक, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, व्यंकटेश जोशी सामाजिक कार्यकर्ते व शेतीनिष्ट,राष्ट्रीय सरचिटणीस दिव्या भोसले, प्रेरक वक्ते स्वामी श्रीकंठानंद, मोनिका राऊत पोलीस उपायुक्त नाशिक, सोहन माचरे पोलीस अधिकारी, व्हॉईस ऑफ मीडिया व व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी तसेच अनेक क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार, महिला कार्यकर्त्या आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अधिवेशनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संदेश पुढे आला – प्रभावाखाली नव्हे, तर विचारांच्या आणि सकारात्मकतेच्या प्रकाशाखाली काम करा. महिला पत्रकारिता हे केवळ व्यवसाय नाही, तर समाजाला दिशा देणारी शक्ती आहे, हे अधिवेशनात ठळकपणे अधोरेखित झाले. राज्यभरातून सर्व पदाधिकारी महिला या अधिवेशनात आल्या आहेत


अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ट्रेनर गजेंद्र मेढी यांच्या मार्गदर्शनात राज्यभरातून आलेल्या महिला पत्रकारांची कार्यशाळा संपन्न होणार आहे. या दुसऱ्या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या प्रमुख वरिष्ठ शास्रज्ञ माधवी ठाकरे यांची प्रकट मुलाखत होणार आहे.

फोटो ओळ:   व्हॉईस ऑफ मीडिया व व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी स्वामी श्रीकंठानंद, व्यंकटेश जोशी सामाजिक कार्यकर्ते व शेतीनिष्ट,

रश्मी मारवाडी प्रदेशाध्यक्ष, महिला विंग,सविता चंद्रे प्रदेशाध्यक्ष ग्रामीण महिला विंग. नाशिक जिल्हा अध्यक्ष कुमार कडलक , अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष गोरख मदने.

======================


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...