• सुनील गोहर यांचा श्री राजेश्वर मंदिरात सत्कार
• उत्तर प्रदेश सरकारने ही केला सत्कार
अकोला :
सुनील गोहर यांचा नुकताच प्रयागराज या ठिकाणी आठ ते दहा दिवस स्वच्छता राखण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी मुक्काम होता. ही बाब ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून उत्तर प्रदेश सरकारच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी त्यांचा सत्कार केला, असे हे असामान्य व्यक्तिमत्व अकोल्यातही सदैव आपल्या वेगळ्या कृतीतून प्रसिद्ध आहे. जसे गणपतीच्या मिरवणुकीत आपली स्वच्छतेची मोहीम राबवत असतात, तसेच हजारो वृक्ष लागवडीचे काम त्यांच्या हातून झाले आहे, कित्येक वर्तमानपत्रात त्यांच्या बातम्या सातत्याने आपल्यासमोर धडकत असतात. प्रत्येकाशी आपुलकीने वागणे प्रत्येकाच्या सुखा दुखात सहभागी होणे हा त्यांचा स्थायी स्वभाव सर्वांना आपलंसं करून टाकणारा आहे, असे व्यक्तिमत्व आज श्री राजेश्वर मंदिरात दर्शनाला आले असता, संस्थेच्या वतीने त्यांच्या आदरातिथ्य करण्यात आले. यावेळी एडवोकेट आर एस ठाकरे, एडवोकेट गिरीशजी देशपांडे, नरेशजी लोहिया, अण्णाजी अभ्यंकर, गजानन घोंगे, विश्वस्त मंडळ श्री राजेश्वर संस्थान अकोला उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा