मुख्य सामग्रीवर वगळा

 मेंदू आजारांवर होमिओपॅथी 

एक प्रभावी औषधोपचार

• जागतिक होमिओपॅथीक

      दिनविशेष: १० एप्रिल 


             लेखक : डाॕ. संदिप चव्हाण

                    होमिओपॕथिक तज्ञ

            संवाद : 95187 04840

           •••••••••••••••••••••

     गाला अनेकदा आपल्या औषधीच्या प्रभावाची चुणूक दाखवणारी पॅथी होमिओपॅथी करिता महत्वाचा दिवस कारण आज 10 एप्रिल रोजी श्वहोमिओपपॅथीचे जनक डॉ.सम्युअल हॅनेमन यांची जयंती म्हणजेच जागतिक होमिओपॅथीक दिवस. त्यानिमित्ताने आपण मेंदू आजारांवर प्रभावी ठरणारी

जगातील सर्वश्रेष्ठ अशी पॅथी म्हणजे होमिओपॅथी आहे कारण या औषधपचाराला प्रभावी कार्य करण्याकरिता जो मार्ग अवलंबला जातो तो म्हणजे सेंटर नरवस सिस्टीम अर्थात मेंदूद्वारेच, त्यामुळेच ही औषधी इतर औषधोपचाराच्या तुलनेत अधिक प्रभावी व कुठलेही दुष्परिणाम न होता कार्य करते.


       त्याकरिताच मेंदूला सुदृढ कसे ठेवायचे आणि आजारी होऊ नये करिता घेण्यात येणारी काळजी कोणती याची आज खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. आज लाखो लोकांचा मेंदू विकारांनी मृत्यू होतोय. आपला मेंदू तल्लख असणं आवश्यक आहे. पण आजच्या धावपळीच्या, धाकाधकीच्या तणावपूर्ण जीवनशैलीत आपल्याला पडलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपली मुलं लगेच गुगल, इंटरनेटकडे धाव घेतात आणि त्यावरून मिळालेल्या (अनेकवेळा अर्धवट) उत्तरांवर समाधान मानतात. खरं तर एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधून काढणे, आपल्यावर कोणतेही संकट आले तर त्यातून बाहेर कसे पडावे, सारासार विचार करून मार्ग कसा काढावा ही क्षमता आपल्या स्वतःमध्ये, आपल्या मेंदूत असते. फक्त आपल्या मेंदूला त्याप्रमाणे ट्रेन करून, ती क्षमता ओळखून तिचा वेळ येईल तेंव्हा वापर करणं आपल्याला जमायला हवं. 



         पण आजकाल सतत वेगवेगळ्या ताण-तणावांशी लढा देण्यात आपला मेंदू थकून जातो. त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, चुकीच्या खाण्याच्या पद्धती, जीवनसत्वांच्या कमतरता यामुळेसुद्धा ती क्षमता कमी झाली आहे. खरं तर औषधांच्या व्यतिरिक्त आपल्या रोजच्या आहारात अनेक औषधी गुण आहेत ज्यामुळे मेंदू तल्लख होऊ शकतो. आज आपण अश्याच काही अन्नपदार्थांची देखील माहिती घेऊ या....


ओमेगा ३ फॅट्स: 

हे फॅट्स मुलांना लहान वयात मिळाले तर त्याने मेंदूच्या पेशींची संख्या वाढायला मदत होते. पण वयाच्या तिसऱ्या वर्षानंतर ती संख्या जास्त वाढत नाही. म्हणून बदाम, अक्रोड, तीळ, गायीचे दूध, जवस हे पदार्थ नियमित मुलांना द्यावे. अपघातामुळे, रक्तस्त्रावामुळे किंवा कोणत्याही कारणांनी मेंदूला इजा झाल्यास त्या वेळी ओमेगा ३ फॅट्स योग्य प्रमाणात मिळाले तर त्यापासून मेंदूचा बचाव होऊ शकतो. मेंदूवर दुष्परिणाम होत नाही.

    माणसाचा मेंदू अतिशय जादुई अवयव आहे. आपण ठरवलं तर योग्य वेळी तो चालवून आयुष्यात काहीही करू शकतो. मात्र या मेंदूची चाळिशी आली की काळजीही तितकीच घ्यावी लागते.  

चाळिशी म्हणजे आयुष्याची मध्यावधी. एक अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा. या टप्प्यावर व्यावसायिक प्रगती, त्यातले यश, कुटुंब, या सगळ्याची थोड्याफार प्रमाणात सवय झाली असते. तर ही प्रगल्भता किंवा मॅच्युरिटी किंवा समंजसपणा मेंदुतील संप्रेरकांतील स्रावांमुळे, आणि त्यातून उद्धभवणाऱ्या पेशींच्या जाळ्यामुळे येतो. त्यालाच सामान्य भाषेत स्मृती असं म्हणतात. त्यामुळे अनुभव येतात. त्यातून एक समंजसपणा निर्माण होतो.

चाळिशीचं वय हे या समंजसपणा आणि विस्मृतीचा सुवर्णमध्य आहे. कारण जसं शरीर झिजतं, तसा मेंदूही झिजायला लागतो. त्यामुळे बुद्धीचा तल्लखपणा पूर्वीसारखा राहत नाही हे आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल.

मेंदूची ही झीज जाणवू लागते. कारण मेंदूच्या पेशी, त्यांचं जाळं, संप्रेरके, या सगळ्यांच्या संरचनेत सूक्ष्म बदल होतो.त्यामुळे मज्जासंस्थेचे विविध आजार उद्भवतात. आज आपण अशाच काही आजारांची देखील माहिती सुद्धा घेऊया.

 1] पक्षाघात किंवा स्ट्रोक किंवा लकवा हा सर्वांत परिचित मज्जासंस्थेचा आजार आहे. एका सर्वेक्षणानुसार जगात पक्षाघाताच्या 92 टक्के केसेस चाळिशीनंतर होतात. जसंजसं वय वाढतं तसं पक्षाघात होण्याचं प्रमाण वाढत जातं.

पक्षाघात दोन प्रकारचे असतात 

पहिला प्रकार रक्तवाहिनी गोठवून टाकणारा असतो त्याला Ischemic Stroke असं म्हणतात. 

दुसरा प्रकार हा रक्तस्रावामुळे होतो. त्याला haemorrhagic असं म्हणतात.

 पक्षाघात हा आजार प्रामुख्याने रक्तवाहिन्यांशी निगडित आहे. रक्तवाहिनी गोठल्यामुळे किंवा तिचं आतलं  अतीव रक्तदाबामुळे आवरण फुटल्यामुळे पक्षाघाताचा झटका येतो. पक्षाघाताचं निदान CT Scan द्वारे करण्यात येतं.

वय, उच्च रक्तदाब

मेदाचं (Cholesterol) चं वाढतं प्रमाण, मद्य, तंबाखू, बिडी सिगारेट यांचं व्यसन आणि अनुवांशिकता ही पक्षाघात होण्याची मुख्य कारणं आहेत. याच कारणामुळे हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो.

पक्षाघातात चेहरा तिरपा होणे, अर्धांगवायू होणं, वाचा जाणं, अचानक दृष्टी अधू होणं, चालण्याचं संतुलन बिघडणं, गोष्टी डबल दिसणं, तीव्र डोकेदुखी, उलटी होणे ही सामान्यत: पक्षाघाताची लक्षणं आहेत.

पक्षाघाताचा झटका आल्यावर तीन तासात उपचार केले तर आयुष्यभराचं अपंगत्व येण्यापासून बचाव करता येतो तसंच काही केसेसममध्ये प्राणही वाचवता येऊ शकतात. प्राथमिक उपचारानंतर हाता पायात राहिलेली क्षीणता, नियमित उपचाराद्वारे घालवता येते. रक्तवाहिन्या गोठणाऱ्या आजारात रक्त पातळ करणारी औषधं नियमितपणे आयुष्यभर घ्यावी लागतात. पक्षाघातात रक्तस्राव झाला असेल तर रक्तदाब नियंत्रित ठेवणं हा एकमेव उपाय आहे.

पक्षाघात टाळण्यासाठी व्यायाम, रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवणं, व्यसनांपासून दूर रहाणे, हृदयविकाराचं निदान करणं आणि त्यावर उपचार करणं अत्यावश्यक आहे. 

2] स्मृतिभ्रंश : चाळिशीनंतर आढळणारा हा आणखी एक मोठा आजार आहे. स्मृतिभ्रंश हा मज्जातंतूंशी (Neurons) निगडित आजार आहे. मेंदूच्या मज्जातंतू बाधित झाल्यावर त्यांची क्षमता कमी होते आणि स्मृतिभ्रंश होतो. स्मृतिभ्रंशात केवळ विस्मरणच होत नाही तर मेंदूचा प्रत्येक भाग कमी काम करायला लागतो. मानवी मेंदूचे Frontal, Temporal, Occipital, and Parietal lobe असे चार भाग पडतात. या चार भागापैंकी Frontal Lobe हा सर्वांत जास्त उत्क्रांत झालेला भाग आहे. भावनांचं नियंत्रण, समाजभावनेचं नियंत्रण, एकाग्रता, काम करण्याची पद्धत, आणि इतर महत्त्वाची कार्य हा भाग करतो. वाचा, संगीत, स्व ची ओळख Frontal lobe मुळे होते.

विस्मृतीच्या आजारात मेंदूचा एक एक भाग त्याचं कार्य करणं थांबवतो. रोग्याचा प्रवास, ‘थोडंफार विसरतो’ पासून ‘मी न माझा राहिलो’ इथपर्यंत होतो. माणसाची ओळखच पुसून टाकणारा हा आजार कुटुबीयांसाठी अत्यंत वेदनादायी असतो. या अवस्थेला आतापर्यंत कोणतंही ठोस कारण सापडलेलं नाही.

म्हातारपणात बिटा अम्लॉईड हे प्रथिन लवकर वाढू लागल्याने हा आजार होतो.परंतू हे का वाढतं याचा शोध अद्याप लागलेला नाही. चाळिशीनंतर या प्रथिनाचं प्रमाण वाढत जातं आणि सत्तरीत तर ते आणखी वाढतं.

स्मृतिभ्रंशाचं निदान करण्यासाठी MRI हे तंत्रज्ञान वापरतात. एकदा निदान झाल्यावर मेंदूची क्षमता वाढवणारी औषधं दिली जातात. दुर्देवाने ही औषधं एका विशिष्ट पातळीनंतर फारशी प्रभावी नसतात. मग यावर उपाय काय तर डोकं चालवत राहणं. शब्दकोडं, सोडवणं, चिंतन, मनन करणं, चर्चा करणं हाच स्मृतिभ्रंश टाळण्याचा उत्तम उपाय आहे.

3] कंपवात :  (पार्किंन्सन्स डिसिज)

कंपवात फोटो स्रोत, GETTY IMAGES मज्जासंस्थेसारखाच शरीरातले विविध हार्मोन आपला मेंदू शाबूत ठेवण्यासाठी जबाबदार असतात. त्यांच्यात बिघाड झाला की अडचणी निर्माण होतात. डोपामाईन हे त्यापैकीच एक. दिवसरात्र मोबाईल हातात घेतल्यावर मेंदूत आनंदलहरी निर्माण करणारं हेच ते हार्मोन.

मात्र डोपामाईनच्या कमतरतेमुळे कंपवात होतो. डोपामाईनच्या अभावामुळे चेहऱ्यावरचा आनंद आणि इतर भाव नाहीसे होतात. शरीरावरचे नियंत्रण सुटत जाते हातात कंप जाणवू लागतो.

आवाजाचा जोर वाढतो मात्र शब्द अस्पष्ट होतात. चालताना बाक येणे, तोल जाणे, पाय घासून चालणे, शरीरात ताठरपणा येणं ही लक्षणं दिसू लागतात. चालण्यातली स्फूर्ती पूर्णपणे जाते. योग्य निदान झाल्यास 70-80 टक्के रुग्ण 80 टक्के बरे होतात..

 या आजाराचा पूर्णपणे नायनाट करता येत नाही हेही तितकंच खरं. त्यामुळे वर उल्लेख केलेली काही लक्षणं दिसल्यास आजाराचं निराकरण करून घेणं क्रमप्राप्त आहे.

4] नसांचे आजार : 

नसांचे आजार हा एक आणखी त्रासदायक प्रकार या वयात सुरू होतो. मधुमेहींचं वाढलेले प्रमाण आणि मुख्यत:शाकाहारी लोकांमध्ये या आजाराचा चांगलाच प्रादुर्भाव जाणवतो.

हातापायांना मुंग्या येणं, आग होणं, ‘विचित्र वाटणं’ इत्यादी अनेक लक्षणं घेऊन रुग्ण डॉक्टरांची वाट धरतात.

काही औषधं, मधुमेहावर नियंत्रण, योग्य आहार आणि भरपूर पाणी याद्वारे हे आजार टाळता येतात. नसांच्या आजाराची इतरही अनेक कारणं आहेत. यात थायरॉईड, रक्ताचे आजार इत्यादींचा समावेश होतो.

5] डोकेदुखी

डोकेदुखी फोटो स्रोत, GETTY इमेजेस गल्ली ते दिल्लीपर्यंत आढळणारी ही सगळ्यात मोठे डोकेदुखी आहे. चाळिशीमध्ये वयानुसार ती अत्यंत समंजस रूप धारण करते. या वयात एक तर डोकेदुखीची सवय होते किंवा त्याची सवय झालेली असते. परंतु या वयात होणारा अत्यंत दुर्मिळ आजार म्हणजे Cluster headache.

या डोकेदुखीत डोळ्याच्या मागे भयंकर वेदना होतात. घणाचे घाव घातल्याप्रमाणे वेदना होतात. डोळ्यात आपोआप अश्रू येतात, डोळे भेसूर लाल होतात. मन अत्यंत बेचैन होतं. हा त्रास काही दिवस ते काही आठवडे चालतो.

गुच्छ्यांमध्ये येणारे हे अटॅक असल्याने याला Cluster headache असं म्हणतात. हे असह्य दुखणं नियंत्रणात येतं खरं परंतु त्यासाठी योग्य औषधोपचार घेणं अत्यावश्यक असतं.

6.] *अपस्मार*

अपस्मार किंवा मिरगी याचा वयाशी तसा संबंध नाही तरीही याचा उल्लेख शेवटी करत होते. या आजारामागे अनेक रुढी आहेत. मेंदूच्या सर्किट मध्ये काही बिघाड झाल्यास शॉर्ट सर्किट होतं आणि अपस्माराचा झटका येतो. हात पाय कडक होतात, कपड्यात लघवी होणं, असे प्रकार दिसून येतात.

सर्वसाधारपणे बाल्यावस्थेत आणि किशोरावस्थेत होणारा हा आजार तसा चाळिशीत कमी होतो आणि साठीत उग्र रुप धारण करतो. हा आजार अनुवांशिक किंवा जनुकीय असू शकतो.त्याचप्रमाणे मेंदूत होणारा संसर्ग, पक्षाघात, डोक्याला मार, रक्तस्राव,  अशा अनेक कारणांनी अपस्माराचा झटका येऊ शकतो.



योग्य उपचार केल्यास 90 टक्के रुग्णांमध्ये हा आजार नियंत्रणात येतो.

मज्जासंस्थेत बिघाड होऊ नये म्हणून नियमित व्यायाम, योग्य आहार आणि भरपूर पाणी, आवश्यक झोप,शारीरिक व्यायाम करा,आहारात सुधारणा करा,रक्तदाब सुधारा,रक्तातील साखर राखणे,कोलेस्ट्रॉल सुधारा

तंबाखू , दारू सारखी व्यसने टाळा

[4/9, 1:41 PM] Dr Chavans Sandip Homoeopathy: मेंदूशी निघडीत असलेल्या वरील सर्व आजारांवर होमिओपॅथी एक रामबाण व गुणकारी औषधोपचार आहे फक्त गरज आहे ती आपण अगदी सुरुवातीलाच आपले योग्य निदान करून आपण योग्य होमीओपॅथिक तज्ञापर्यंत पोहचणे आणि योग्य औषधोपचार घेऊन या मेंदू विकारांवर मात करने, या सर्व बाबींमध्ये महत्वाची बाब आहे आपली प्रतिकारशक्ती आणि मानसिक स्थिती आणि या दोन्हीही बाबींवर प्रभावीपणे कार्य करणारी औषधोपचार पद्धती म्हणजे होमिओपॅथी.विशेष बाब म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आजरांची लक्षणे,  व्यक्तीच्या चांगल्या वाईट सवयी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे व्यक्ती परत्वे स्वभाव गुणधर्म या सर्वांची सांगड घालून व्यक्तीनुरूप निघणारी “सिमलिया सिमिलीबस क्यूरेंटर” या सिद्धांतावर आधारित औषधी दिली जाते. 

         असं म्हणतात स्वभावाला औषध नाही परंतु स्वभावानुरूप औषधी देण्याची औषध प्रणाली म्हणजे होमिओपॅथी

       कवी कलशांन पासन ते संत कबीरांपर्यंत ज्या मनाच्या प्रभावाचा उल्लेख आवर्जून केलाय “मन के हारे हार है, मन के जीते जीत” म्हणजे मनाने आपण खचलो तर तुमचा पराजय निश्चित आहे आणि मनाने जिंकले तर तुमचा विजय हा सुनिश्चितच आहे तात्पर्य असे की जीवनामध्ये मानसिक स्थर्य अधिक महत्वाचे आहे आणि त्याकरिता जगात एकमेव औषधपचार पद्धती आहे ती म्हणजे होमिओपॅथी कारण एकमेव औषधपचार पद्धती आहे जी की सेंट्रल नर्व्हस सिस्टीम द्वारा कार्य करून शरीराला व्याधीमुक्त करते, त्यामुळे जागतिक होमिओपॅथीक दिवसाला औषधपचार प्रणालीमध्ये होमिओपॅथीला प्राथमिकता द्या व निरोगी,सुदृढ आयुष्य जगण्याचा संकल्प घ्या.




 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...