मुख्य सामग्रीवर वगळा

 



•  कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट राज्यस्तरीय जयंती उत्सवाच्या

•  स्वागताध्यक्षपदी अॕड. श्री गजानन पुंडकर यांची निवड 

   (प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे)

अमरावती : महाराष्ट्रातील रयत शिक्षण शिक्षण संस्थेनंतर दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अॕड. गजानन पुंडकर यांची कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट राज्यस्तरीय जयंती उत्सवाच्या स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

       श्री सुरेश भट यांच्या जयंती उत्सवानिमित्त पूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून या सर्व उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्र दिनी म्हणजे दिनांक 1 मे 2025 रोजी अमरावती पासून होणार असून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. 

     कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या जयंती उत्सव संपन्न करण्यासाठी आज अमरावती येथे एका सभेचे आयोजन अमरावतीची राष्ट्रीय संस्था मिशन आयएएस व युवा संवाद प्रतिष्ठानच्या वतीने अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामागील आर डी फाउंडेशन मध्ये करण्यात आले होते.

   कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट हे अमरावतीचे सुपुत्र असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या कार्याचा गौरव होत आहे. तसेच त्यांच्या नावाने नागपूर येथे स्वर्गीय श्री सुरेश भट भव्य सभागृह उभारण्यात आले आहे .त्यांच्या कर्तुत्वाचा दखल घेऊन श्री सुरेश भट यांच्या स्मृतिपित्त वर्षभर विविध उपक्रम राबविण्याचे समितीने ठरवले आहे. हा जन्मोत्सव संपन्न करण्यासाठी एका समितीचे गठन करण्यात आले असून त्या मध्ये सदस्य म्हणून सर्वश्री प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे,  श्री नितीन पवित्रकार, अभिनंदन पेंढारी, विराग जाखड, नरेंद्र बोरकर, राजेश देशमुख, कुणाल निखिल वानखडे, रावसाहेब वाटाणे, शिवराज टेकाळे, बंडोपंत भुयार, सुभाष धोटे, सचिन निर्मळ, सुप्रसिद्ध वराडी लेखक श्री आबासाहेब कडू, गिरीश  सोळंके, संदीप देशमुख यांचा समावेश आहे. 

    आरडी फाउंडेशनचे श्री आर डी देशमुख यांनी त्यांच्या प्रतिष्ठान तर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत केले. अॕड. गजानन पुंडकर यांची स्वागत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उपस्थित सर्वांनी त्यांचे याप्रसंगी अभिनंदन केले. कार्यक्रमाची सांगता श्री नितीन पवित्रकार यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.

                    00000

         

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...