मुख्य सामग्रीवर वगळा

 


                ज्यूस थेरपी     

       साधारणत: लोक उन्हाळ्यामध्ये सकाळची सुरुवात फळांचा रस पिऊन करतात. मात्र, उन्हाळ्यातच ज्यूस थेरपी केल्यास दिवसभर ऊर्जा मिळेल आणि अनेक आजारांपासूनही संरक्षण मिळेल. जाणून घेऊया त्याबाबत अधिक. 

       कशी घ्यावी ज्यूस थेरपी? 

ज्यूस थेरपी सुरू करण्यापूर्वी मानसिकदृष्ट्या तयार असणे अत्यंत आवश्यक आहे. याअंतर्गत दिवसभरात पाच ते सहावेळा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्यूसचे सेवन केले जाते. दिवसाच्या सुरुवातीला सर्वप्रथम दोन ग्लास लिंबूपाणी प्यावे. त्यानंतर एखाद्या फळाचा रस प्यावा. 



       संर्त्याचा रस, टोमॅटो, गाजर आणि बीट यांचा रस एकत्र करून सेवन करावा. दुपारी कलिंगडाचा रस पिणे जास्त फायदेशीर ठरू शकते. सायंकाळी संत्रे, सफरचंद आणि द्राक्षाचा रस एकत्र करून घ्यावा. या ज्यूस डायटमध्ये फेरबदल करत राहावेत. उदाहरणार्थ ज्यूसमध्ये पालक, काकडीसुद्धा मिक्स करू शकता.

          वेगवेगळ्या ज्यूसचे फायदे"

 बीट या फळाचा रस रक्त शुद्ध करतो. यामध्ये असलेली पोषक द्रव्ये पोट साफ करतात. गाजराच्या रसात असलेले ’अ‘ जीवनसत्त्व यकृतासाठी खूफ फायदेशीर आहे. हे जीवनसत्त्व वजन कमी करणे, डोळे निरोगी ठेवणे आणि कॅन्सरपासून बचाव करण्यातही सहाय्यभूत ठरतो.    


            पालकाचा रस दिवसभरातून दोनवेळा पिल्यास रक्तशर्करा नियंत्रित राहते. टोमॅटोचा ज्यूस हृदयासंबंधित आजार बरे करण्यास मदत करतो.                   काकडीचा रस सांधेदुखीपासून बचाव करतो. यामध्ये पोटॅशियमचे चांगले प्रमाण असते. किडनीला ते फायदेशीर आहे. याशिवाय उच्च रक्तदाबही नियंत्रित राहतो आणि त्वचेशी संबंधित आजारही बरे होतात. 



       चेरीच्या रसात ’क‘ जीवनसत्त्व आणि पोटॅशियमचे चांगले प्रमाण असते. यामुळे अॅनिमियापासूनही (रक्तक्षय) बचाव होतो.  लिंबू-पाणी पिल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.  एवढेच नाही तर शरीरातील दूषित पदार्थ बाहेर पडतात आणि डायरियाही (अतिसार) होत नाही. 

        पपईचा रस पचनक्रियेशी संबंधित आजार दूर करतो. द्राक्षाचा रस रक्तदाब कमी करतो.  रक्तशर्करा पातळीही नियंत्रित ठेवतो. याशिवाय दिवसभर ऊर्जा मिळते.



विशेष सूचना : हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा.

=======================

=======================


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...