चांदूर रेल्वे : रेल्वे गेट कायम बंद
पशूपालक शेतकरी अडचणीत
चांदूर रेल्वे : येथील शिवाजी नगर परिसरातील रेल्वेगेट रेल्वे प्रशासनाने कायम बंद केल्याने पशूपालक शेतकरी यांना मोठी समस्या निर्माण झाल्याने सदर्हू रेल्वेगेट तात्काळ पूर्वत सुरु करण्याची मागणी शेतकय्रांनी संबंधित प्रशासनास एका निवेदनाद्वारे केली आहे.
उड्डाण पूल असला तरी त्यावरुन बैलगाडी नेताना अडचण होतेय. बैलबंडी नेता येत नाही. शेतात येण्या जाण्याचा मार्ग बंद झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.
रेल्वेगेट तात्काळ सुरु करावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा