मुख्य सामग्रीवर वगळा




•  रामनवमीची आख्यायिका

•   रामनवमीची संपूर्ण माहिती, कथा, पूजा

        •  पंडित व्यंकटेश देशपांडे 

        पुराण आख्यायिकेनुसार लंकापती रावणाच्या अत्याचाराला संपवण्यासाठी भगवान विष्णूने राम अवतार घेतला. भगवान राम हे विष्णूचा सातवा अवतार म्हटले जातात. जो त्रेतायुगामध्ये धर्माच्या स्थापनेसाठी पृथ्वीवर अवतरला होता. या दिवशी सर्वजण भगवान रामाच्या जन्मानिमित्त आनंद साजरा करतात. रामनवमीच्या सणाच्या दिवशी चैत्र नवरात्र संपन्न होते. शास्त्रानुसार, भगवान रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी माता दुर्गेची उपासना केली होती. याच दिवशी अयोध्येमध्ये चैत्र राम जत्रेचंही भव्य आयोजन केलं जातं. सर्वजन एकमेंकांना या निमित्ताने रामनवमीच्या शुभेच्छा ही देतात.

     रामनवमीची आख्यायिका

     हिंदू धर्म ग्रंथात प्रभू श्रीराम आणि त्यांच्या तीन भावंडांच्या जन्माबाबत एक पौराणिक कथा सांगण्यात आली आहे. या कथेनुसार राजा दशरथाला तीन राण्या होत्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. जेव्हा तिन्ही राण्यांना पुत्र प्राप्ती झाली नाही तेव्हा राजा दशरथाने पुत्रेष्टी यज्ञ केला. प्रसादामध्ये यज्ञातून प्रकट झालेली खीर तिन्ही राण्यांना खाऊ घातली. काही काळाने राजा दशरथाच्या राजवाड्यात आनंदवार्ता मिळाली की, तिन्ही राण्या गर्भवती आहेत. त्यानंतर शुक्ल नवमीला कौशल्येने राम, कैकेयी ने भरत आणि सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांना जन्म दिला. अशाप्रकारे राजा दशरथाला आता त्याचे उत्तराधिकारी मिळाले. तेव्हापासून या तिथीला रामनवमीच्या रूपाने साजरं केलं जातं.




रामनवमीची पूजा कशी करावी?

     रामनवमीच्या दिवशी पहाटे उठावे. आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. पूजेचं सर्व सामान घेऊन पूजेच्या ठिकाणी बसावे. भगवान श्रीरामाच्या मूर्तीला शुद्ध पवित्र ताज्या पाण्याने स्नान घालावे. नंतर धूपदीप, आरती, फुलं, चंदन इत्यादी अर्पित करून पूजा करावी. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. जर तुम्ही नवरात्रीचे उपवास केले असतील तर तुमच्या पूजेच्या साहित्यात तुळशीचं पान आणि कमळ असलंच पाहिजे. त्यानंतर प्रभू श्रीरामाची नवमी पूजा षोडशोपचारे पूर्ण करावी. खीर आणि फळांचा प्रसाद म्हणून दाखवावा. या दिवशी अनेकांकडे राम जन्म सोहळा साजरा केला जातो. काहींकडे चैत्र नवरात्रीनिमित्त कन्यापूजनही असते. कोकणात या निमित्ताने भरपूर ठिकाणी रामाचा पालखी सोहळा आणि जत्रा असतात.

   रामनवमीसाठी विशेष नैवेद्य     

    रामनवमीच्या दिवशी अनेकजण चैत्र नवरात्रीचा उपवास सोडून रामजन्म साजरा करतात किंवा काहीजण फक्त रामनवमीला उपवास करतात. मग उपवास कांदा-लसूण विरहीत सात्विक जेवण जेवून सोडतात. बरेच जणांकडे रामनवमीच्या निमित्ताने पूरी-भाजी, शिरा आणि काळे चणे असतात. रामनवमीचा दिवस हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी विधीवत भगवान रामाची पूजा केली जाते. या दिवशी हजारो लोकं अयोध्येला जाऊन पुण्य सलिला शरयू नदीमध्ये स्नान करून पुण्यार्जन करतात. स्नान करून ते भक्तगण भगवान रामाला आठवून भजन-पूजन करतात. घरोघरी आणि मंदिरांमध्ये राम चरित्राचा पाठ केला जातो.

रामनवमीची पूजा कशी करावी?

रामनवमीच्या दिवशी पहाटे उठावे. आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे. पूजेचं सर्व सामान घेऊन पूजेच्या ठिकाणी बसावे. भगवान श्रीरामाच्या मूर्तीला शुद्ध पवित्र ताज्या पाण्याने स्नान घालावे. नंतर धूपदीप, आरती, फुलं, चंदन इत्यादी अर्पित करून पूजा करावी. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. जर तुम्ही नवरात्रीचे उपवास केले असतील तर तुमच्या पूजेच्या साहित्यात तुळशीचं पान आणि कमळ असलंच पाहिजे. त्यानंतर प्रभू श्रीरामाची नवमी पूजा षोडशोपचारे पूर्ण करावी. खीर आणि फळांचा प्रसाद म्हणून दाखवावा. या दिवशी अनेकांकडे राम जन्म सोहळा साजरा केला जातो. काहींकडे चैत्र नवरात्रीनिमित्त कन्यापूजनही असते. कोकणात या निमित्ताने भरपूर ठिकाणी रामाचा पालखी सोहळा आणि जत्रा असतात.


रामनवमीसाठी विशेष नैवेद्य

रामनवमीसाठी नैवेद्य


रामनवमीच्या दिवशी अनेकजण चैत्र नवरात्रीचा उपवास सोडून रामजन्म साजरा करतात किंवा काहीजण फक्त रामनवमीला उपवास करतात. मग उपवास कांदा-लसूण विरहीत सात्विक जेवण जेवून सोडतात. बरेच जणांकडे रामनवमीच्या निमित्ताने पूरी-भाजी, शिरा आणि काळे चणे असतात.

श्रीरामाच्या पुजेत पांढऱ्या मिठाई आणि पांढऱ्या फळाचं महत्त्व आहे. या दिवशी प्रसादाच्या रूपात पंचामृत, श्रीखंड, खीर आणि हलवा यांचा प्रसाद दाखवला जातो. श्रीरामाच्या पूजेत दूध आणि तूपाच विशेष महत्त्व आहे. यामुळेच रामनवमीच्या दिवशी तूपापासून बनवलेल्या मिठाया खाल्ल्या जातात. खरंतर उपवास आणि प्रसाद हे दोन्ही उत्सवांचा आवश्यक भाग आहेत. रामनवमीच्या दिवशी प्रभू श्रीरामाला खीर, केशर भात किंवा धण्याचा नैवेद्य दाखवावा. जर तुम्ही मिठाईचा नैवेद्य दाखवणार असाल तर बर्फी, गुलाबजामून किंवा कलाकंदचा नैवेद्य दाखवणे उत्तम असतं.

श्रीरामाच्या पूजेसाठी खास मंत्र

श्रीराम हे हिंदूंमधील सर्वात लोकप्रिय देवता आहे. रामाची पूजा ही प्रत्येक घरात होते आणि रामाला आदर्श मानवाचं उदाहरण मानलं जातं. अशी मान्यता आहे की, रामनवमीच्या दिवशी भगवान विष्णुंचा सातवा अवतार असलेल्या भगवान श्रीरामाच्या कथांचा पाठ करणं खूप पुण्यदायी असते. या दिवशी जागरण करून रामायणाचं पठण केल्याने आत्मिक शुद्धी होते आणि पापक्षालन होतं. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही रामनामाचा जपही करू शकता. कलियुगात लोकांकडे वेळ कमी असल्याचं लक्षात घेऊ महर्षी वाल्मिकी यांचं एक श्लोकी रामायणाचंही पठण केलं जातं. ज्यामध्ये संपूर्ण रामायणाचं सार आहे. 

अदौ राम तपोवनादि गमनं हत्वा मृगं कांचनम्। वैदेही हरणं जटायु  मरणं सुग्रीव संभाषणम्। वालि निग्रहणं समुद्र तरणं लंका पुरी दास्हम्। पाश्चाद् रावण कुंभकर्ण हननं तद्धि रामायणम्।


संत तुलसीदास यांनीही बालकांडच्या तिसऱ्या दोह्यांमध्ये एक श्लोकी रामायणाची रचना केली आहे. तुम्ही त्याचंही पठण करू शकता. 

‘नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागम् पाणौ महासायकचारुचापं युद्ध नमामि रामं रघुवंशनाथम्’


पवित्र मनाने हातपाय धुवून भगवान रामाची मूर्ती किंवा फोटोच्या समोर ध्यान लावून दिवसभरात कोणत्याही वेळी 9 वेळा एक श्लोकी रामायणाचं पठण केल्याने संपूर्ण रामायणाच्या पठणाचं फळ मिळतं. भक्तगण रामाच्या मंत्राचाही रामनवमीच्या निमित्ताने जप करतात. ज्यामुळे त्यांच्यावर प्रभू श्रीरामांची कृपा होते. या मंत्रांमध्ये खालील मंत्रांचा समावेश होतो. 

    •  ॐ श्री रामाय नमः॥

    •  श्रीराम जय राम जय जय राम ।।

    •   दाशरथये विद्महे सीतावल्लभाय            धीमहि, तन्नो राम प्रचोदयात्॥

    •  ॐ आपदामपहर्तारम् दाताराम्                सर्वसम्पदाम्।

     •  लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो-भूयो         नमाम्यहम्॥

     •  श्री राम जय राम कोदण्ड राम॥

अशा प्रकारे आपण राम नवमी साजरी करू शकते.

तसेच राम रक्षा स्तोत्राचे पाठ करावे.

           •  पंडित व्यंकटेश देशपांडे 

               संपर्क :- 7499121664/                               9881601459.









टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...