मुख्य सामग्रीवर वगळा


•  शतायुषी आत्याची अचानक एक्झिट...            
             लेखक : ॲड.सुधाकर खुमकर 
                       स़ंवाद- 7020446473
       
         बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात खडदगाव हे आमच्या आत्याचे गाव... नर्मदाबाई पुंडलिकराव पाटील मानकर हे आत्याचे नाव... मात्र लहानपणापासून 'खडदगावची आत्या' हीच तिची ओळख आमच्या मनावर कोरलेली...आत्याच्या लग्नानंतर अल्पकाळातच मामा गेले... आत्या खचली नाही. एकुलता एक लेक अजाबराव पाटील मानकर यांचा सांभाळ करत जीवनाचा गाडा हाकला...आजबराव भाऊंनीही आईचा शब्द शेवटपर्यंत प्रमाण मानला. दानधर्म आणि देवदर्शनासाठी, तीर्थयात्रेसाठी भाऊंनी आईला कधीही रोखले नाही.
   

 मामा गेल्यानंतर सुनी झालेली हवेली नातवांच्या आगमनाने पुन्हा फुलली, गजबजली. येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ, पाहुण्यांची आवभगत, सर्वांच्या ख्याली खुशाली विचारल्याशिवाय आत्याला चैन पडायची नाही. आमच्या वडिलांसह  एकूण ५ भाऊ, त्यांना ३ बहिणी असा मोठा खटला... दरवर्षी एकाच्या घरी तरी काहीतरी लग्नकार्य ठरलेलं..आत्या हमखास बेलखेडला यायचीच. दोन वर्षांपूर्वी आत्याने वयाची शंभरी पूर्ण केलेली.
           


     तरीही आमची आई गेल्याचे कळताच आत्या नातवाला घेऊन गावात हजर. खाण्या पिण्याचे पथ्य, सात्विक आणि धार्मिक विचार यामुळे या वयातही हाडांच्या शस्त्रक्रिया झाल्यानंतरही आत्या ठणठणीत झाली होती. 
  
   गेल्या आठ दिवसांपासून मात्र तिची अचानक तब्येत बिघडली आणि आज गुरुवारी ३ एप्रिल २०२५ रोजी तिने अखेरचा श्वास घेतला... तीन वर्षांपूर्वीच अजबराव भाऊंचेही निधन झाल्याने आत्या तशी खचली होती, पण नातवांनी आपल्या आजीला कशाचीही कमी भासू दिली नाही. आज आपल्या आजीला शेवटचा निरोप देताना सर्व नातवंडे (अमोल, अनंता, गोपाल,मधुसूदन) ढसाढसा रडत होती... आत्याच्या जाण्याने खडदगावातील हवेली पुन्हा एकदा सुनी झाली. आत्याला भावपूर्ण श्रद्धांजली...

           •  लेखक : ॲड.सुधाकर खुमकर 
                       स़ंवाद- 7020446473
              -------------------




बातमी व जाहिरातीसाठी संपर्क : 
               विजय द. केंदरकर 
                 ज्येष्ठ पत्रकार तथा कार्याध्यक्ष 
            व्हाॕईस आॕफ मीडिया, अकोला जिल्हा
                  मोबा. नं. 9371854706

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...