• पुंडलीकबाबा आश्रम राऊतवाडी येथे मुंगसाजी महाराज ग्रंथ सामुदायीक पारायण सोहळा
• ह.भ.प. सोनुमहाराज कुळकर्णी यांचे संगीत शिवपुराण
अकोला :
श्री परमहंस पुंडलीक महाराज आश्रम
राऊतवाडी, अकोला येथे 'श्री' च्या आगमणाप्रित्यर्थ सामुदायीक जीवनामृत पारायण सप्ताह आयोजित करण्यात आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही मंगलवार दि.०८ एप्रिल पासून ते दि.१५ एप्रिल २०२५ पर्यंत भगवान मुंगसाजी माऊली जिवनामृत ग्रंथाचे सामुदायीक पारायण आयोजीत केले आहे. तसेच दि. १४/४/२०२५ ला परमहंस पुंडलिक बाबा, पुंडलिक नगर, मुर्तिजापुर यांचे पालखीचे आगमन होईल व गायनाचार्य नारायण महाराज काळे, मृदगाचार्य ज्ञानेश्वरमहाराज इंगळे, अंबिकापूर, सर्व टाळकरी दूधाळा. संध्याकाळी ५ ते ७ हरीपाठ होईल व नंतर ७ ते ९ ह.भ.प. दिलिप महाराज पान्हेरा यांचे हरीकिर्तन होईल.
दि. १५/४/२०२५ ला सकाळी ७ ते ९ श्री च्या पालखीची मिरवणूक निघेल. बाबांचे लहान बंधू ह.भ.प. विठ्ठलदेव पातोंड हे हजर राहतील. नंतर ह.भ.प. योगेश महाराज खवले यांचे काल्याचे किर्तन होईल.
दहीहांडी कार्यक्रम परमहंस पुंडलिक देव यांचे वंशज ह.भ.प. विवेकभाऊ पांतोड व्यवस्थापक पुंडलिक महाराज संस्थान मुर्तिजापूर यांचे हस्ते होईल. नंतर 'महाप्रसाद'. "जिवनामृत ग्रंथांचे व्यासपीठ" ह.भ.प. हरीमहाराज तालोट यांचे राहील. पारायणाची वेळ सकाळी १० ते १२ असेल.
प. पुंडलीकबाबा आश्रम राऊतवाडी, अकोला येथे मुंगसाजी महाराज ग्रंथ सामुदायीक पारायण सोहळा व ह.भ.प. सोनुमहाराज कुळकर्णी यांचे संगीत शिवपुराण : संध्या. ६ ते ९ वा. होईल. दि. १५/४/२०२५ ला दुपारी १२.३० 'महाप्रसाद' होइल.
ज्या भावीक भक्तांनी उत्सवाप्रित्यर्थ देणगी अगर अत्रदान करावयाचे असल्यास त्यांनी आश्रमात आणून द्यावे. ऑनलाईन पेमेंटसाठी बँक दि जनता कर्मशियल बैंक, तापडीया नगर शाखा, तात्यासाहेब ओक मार्ग, जठारपेठ चौक, अकोला A/c. No. 009103201010975 RTGS/NEFT IFSC: AKJB0000009 प्रेषक व्यवस्थापक तथा समस्त विश्वस्त मंडळ, श्री परमहंस पुंडलीक महाराज आश्रम राऊतवाडी, (ट्रस्ट र.नं.ई-३५५) अकोला. मो. ७७०९९२१८०९, ०७२४-२४५६५९८.
भाविक भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन धनराज घटाळे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा