• श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी व अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाला सुरुवात
अकोला : स्थानिक डाबकी रोड स्थित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी व अखंड नाम जप यज्ञ सप्ताह
दि. २० ते २६ एप्रिलपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये रविवार, दि. २० एप्रिल रोजी मंडल स्थापना, अग्नीस्थापना, स्थापित देवता हवन नित्यस्वाहाकार, सोमवार दि. २१ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार, गणेश याग, मनोबोध याग, मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार, चंडी याग, बुधवार दि. २३ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार, स्वामी याग, गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार, गिताई याग, शुक्रवार दि.२५ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार, रुद्र याग, मल्हारी याग, शनिवार दि. २६ एप्रिल रोजी नित्यस्वाहाकार,
बली पूणर्णाहुती, श्री सत्यदत्त पुजन, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी, सांगता समारोह सकाळी १०.३० मि. महाआरती अखंड नामजप सप्ताह सांगता शनिवार दि.२६ एप्रिल रोजी दुपारी ११ ते ३ पर्यंत प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्ष अनिलभाऊ गरड यांनी केले आहे.
====================
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा