• श्री बाराभाई गणेशोत्सव मंडळातर्फे श्रीराम नवमी शोभायात्रेचे स्वागत
अकोला :
श्री राजराजेशवर मंदिरा मध्ये मानाच्या श्रीराम मंदिराच्या पालखीतील प्रभु श्रीराम दरबारची विधिवत पूजा अर्चना व आरती करून श्रीराम नवमी शोभायात्रेला सुरवात करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत शोभा यात्रेला सुरुवात झाली. प्रथम मानाची राम मंदिराची पालखीवर गुलाबापुष्पांचा वर्षाव करून प्रभू श्रीरामचंद्राचे पूजन श्री बाराभाई गणेशोत्सव मंडळा तर्फे करून स्वागत करण्यात आले. राम मंदिर पालखी, व इतर झाक्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री धर्मनाथजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या हस्ते सर्व झाक्यांचे स्वागत करण्यात आले. व मिरवणुकीमध्ये सहभागी सर्व राम भक्तांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून मंडळाच्यावतीने पिण्याच्या पाण्याची सेवा देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा