शिवणी येथे डाॕ. बाबासाहेब आंबेडकर जयंती थाटात संपन्न
अकोला : 14 एप्रिल डाॕ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी दहा वाजता डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून त्या ठिकाणी उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रम अकोल्यातील शिवणी येथील बुद्धविहारात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावणभाऊ इंगळे यांच्या नेतृत्वात संपन्न झाला. कार्यक्रमाला शंभरच्यावर जवळपास उपस्थिती होती. सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रावणभाऊ इंगळे यांचे मार्गदर्शन झाले. नंतर श्रीकांतजी देशपांडे यांचे समारोपिय मार्गदर्शन झाले.
मोहन मिश्रा, सुनिल पसारी यांच्या उपस्थितीत गजानन घोंगे यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात शिवणीतील नगरसेवक विशाल इंगळे व प्रविण जगताप हे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा