• होमिओपॅथीच्या प्रसारासाठी जनजागरणाची गरज
: डॉ. कवीश्वर
• रेडक्रॉस सोसायटीतर्फे होमिओपॅथीदिनी गौरव
अकोला : गेल्या दोन शतकापूर्वी होमिओपॅथीचे महत्त्व ओळखून आपल्या राज्यात होमिओपॅथीचा दवाखाना उघडून होमिओपॅथीला चालना देण्यासाठी कार्य करणारे छत्रपती शाहू महाराज हे निश्चितच दूरदृष्टीचे शासक होते. आज सत्ताधान्यांनी होमिओपॅथीला तिचे स्थान मिळवून दिल्यास सामान्य माणसाला पण आपल्या असाध्य आजारावर मात करणे शक्य होणार असल्याचा विश्वास खामगावच्या पंचशील होमिओपॅथी महाविद्यालयाचे अध्यक्ष व विदर्भातील ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ. दादासाहेब कवीश्वर यांनी व्यक्त केला. जागतिक होमिओपॅथी दिनानिमित डॉ. कवीश्वर यांच्या वैद्यकीय सेवा कार्याचा गौरव म्हणून त्यांना खा. अनुप धोत्रे यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. स्थानीय रेडक्रॉस सोसायटी येथे संपन्न झालेल्या या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खा. अनुप धोत्रे होते. तर मंचावर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंग तुषार वारे, रेडक्रॉसचे चेअरमन डॉ. किशोर मालोकार, मानद सचिव प्रभजितसिंह बछेर आदी यावेळी उपस्थित होते. डॉ. कवीश्वर पुढे म्हणाले शासकीय पातळीवर होमिओपॅथी तज्ञांची नियुक्ती करून या वैज्ञानिक चिकित्सेला राजाश्रय मिळाला तर सामान्य रुग्णांसाठी ती मोठी पर्वणी ठरणार आहे. याप्रसंगी खा. अनुप धोत्रे यांनी होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचा परामर्श घेतला. या पॅथीस शासन दरबारी निश्चितच स्थान मिळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे आश्वासन खा. धोत्रे यांनी यावेळी देऊन डॉ. कवीश्वर यांचा गुणगौरव केला. यावेळी डॉ. तरंग तुषार वारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कपिल रावदेव यांनी तर आभार अॅड. सुभाषसिह ठाकूर यांनी मानलेत. यावेळी लायन्सचे सुभाष चांडक, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. दीपाली शेळके, डॉ. सतीश उटांगळे, डॉ. केदार काजळे, डॉ. सिमरनजितसिंह बछेर, अनमोल सिंह बछेर, डॉ. रजत मालोकार, डॉ. दीप्ती मालोकार, डॉ. योगिता चव्हाण, डॉ. जयश्री देवकर, डॉ. राजेश अग्रवाल, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. सतीश कुलकर्णी, डॉ. राजीव देशपांडे, डॉ. नरेश गोंड, डॉ. तुषार मालोकार समवेत बहुसंख्य डॉक्टर्स व नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा