मुख्य सामग्रीवर वगळा



•     बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले..

                - लेखक : अक्षय जोशी

                    ( मो.नं. 7744970281)

       एक विलक्षण आणि अभ्यासू नेतृत्व प्रत्येक विषयाची योग्य जाण आणि समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी सदैव तत्पर असणारे नेतृत्व ज्यांच्या क्रियाशील आणि तडफदार कार्यशैली मुळे ज्या मतदारसंघात कधीच एकच व्यक्ती तीनवेळा जिंकू शकला नाही अश्या मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा अकोला पूर्व मतदारसंघात विजयी होऊन रणधीर भाऊंनी इतिहास रचला.इतिहास तर रचला पण त्याच सोबत कमावली ती जिवाभावाची आणि असेल त्या परिस्थितीत साथ देणारी कार्यकर्त्यांची फौज.2014 पासून सुरु झालेला प्रवास ज्यावेळी रणधीर सावरकर हे नावं मतदारसंघातील नागरिकांकरिता हे नवखं होतं तरी देखील आदरणीय संजय भाऊ धोत्रे,लालाजी यांच्या सूक्ष नियोजनाने आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीने रणधीर भाऊ पहिल्यांदा विजयी होत विधान भवनात पोहोचले आणि अकोला पूर्व च्या विकासाला गती मिळाली.शेती,माती,उद्योग कष्टकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नाना सरकार दरबारी मांडत वाचा फोडत ग्रामीण भाग असो वा शहरी भागातील नागरिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे हक्काचे आमदार झाले रणधीर भाऊ! काम कोणतं ही असो यांच्या कडे गेलं की 100% निकाल लागणार आणि त्यात ही बघतो,करतो नाही डायरेक्ट "लाव रे फोन,रणधीर सावरकर बोलतो!" एवढा विषय झाला की समोरच्या अधिकाऱ्याने अडलेले काम केलेच आणि याच कार्यशैलीमुळे मतदारसंघातीलच नव्हे तर जिल्ह्यातील आणि संपूर्ण विदर्भातील,महाराष्ट्रातील कार्यकर्ते भाऊंकडे आशेने पाहतात.प्रत्येक विषयाची सखोल माहिती असणारं हे नेतृत्व आपल्या कर्तृत्वाने इतकं मोठं झालं की जेष्ठ नेत्यांच्या अनुपस्थितीत जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा एक हक्काचं नेतृत्व झालं.आदरणीय भाऊसाहेब फुंडकर,आदरणीय संजूभाऊ धोत्रे,आदरणीय लालाजी या त्रिसूत्रीने संघटन वाढी साठी केलेलं काम समोर ठेवून फक्त अकोला पुरता नव्हे तर आज रणधीर भाऊ महाराष्ट्र स्तरावर नेतृत्व करत आहेत आणि आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे.रा.स्व.संघ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा परीस स्पर्श झाला मी संघटेनच्या कामात सक्रिय झालो पण राजकीय पक्षात काम करतांना माझ्यासारख्या अति सामान्य कुटुंबातून येणाऱ्या एका कार्यकर्त्याला जो पालफॉर्म रणधीर भाऊ नी जिल्ह्यात काम करताना दिला त्याचमुळे मी आज चांगले काही तरी करू शकतो आहे.जो विश्वास रणधीरभाऊ,अनुप भाऊ आणि इतर नेत्यांनी ठेवला त्याच मुळे आज काही तरी चांगलं करू शकतो आहे आणि नक्कीच भाऊंनी ठेवलेला विश्वास आई वडिलांच्या आशीर्वादाने व सहकाऱ्यांच्या साथीनं सार्थकी लावीन.आज भाऊंचा वाढदिवस त्यानिमित्त खुप शुभेच्छा आणि नमस्कार...

                    -  अक्षय जोशी,अकोला




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...