मुख्य सामग्रीवर वगळा


  •  कलिंगड विकत घेताना दोन गोष्टी नक्की तपासून घ्या

•  नैसर्गिक आहे की कृत्रिम लगेच कळेल.....!

        मार्च आणि एप्रिलमध्ये उन्हाळ्याने जीवाची एवढी काहिली झाली आहे की आणखी दीड महिना उष्णतेत काढावा लागणार आहे हे नक्की! मे महिन्यात तर उन्हाळा ऐन भरात असतो आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तो ओसरायला लागतो. यंदा बहावा वेळेत फुलल्याने तिथून पुढच्या साठ दिवसात पाऊस पडणार असे म्हटले जाते. तसेच यंदा पंचांग तसेच हवामान खात्यानेही पाऊस भरपूर पडणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे. 
       पण दिल्ली दूर आहे! आपण एप्रिल शेवटाच्या उम्बरठ्यावर उभे आहोत. पावसाच्या विचाराने मनाला गारठा वाटत असला तरी शरीराची उष्णता क्षमवण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करणे आवश्यक आहे. 
         त्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे कलिंगड...!  ऋतुमानानुसार बाजारात आलेली फळं, भाज्या खाव्यात असे आहार तज्ज्ञ सांगतात. उन्हाळ्यात टरबूज आणि खरबूज यांचे सेवन शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. दीर्घकाळ पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन कमी करणारे लोकही कलिंगडाचे मोठ्या प्रमाणात सेवन करतात. 


        परंतु, बऱ्याचदा ३०, ४०, ८०, १०० असे वाट्टेल तेवढे पैसे देऊन आपण कलिंगड विकत आणतो आणि घरी येऊन चिरल्यावर ते पांढरे निघते नाहीतर पांचट निघते. घाऊक प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी काही विक्रेते फळ पिकण्याआधी रसायनाचे डोस देऊन फळांची वाढ करतात. 
       अशा वेळी पिकलेल्या आणि नैसर्गिक रित्या बनवलेल्या कलिंगडाची निवड कशी करावी ते जाणून घेऊ...
       कलिंगड विकत घेताना देठाचा भाग पूर्ण वाळला आहे का ते पाहून घ्या. तो तसा असेल तर कलिंगड आतून पूर्ण पिकलेले व गोड आहे असे समजावे. शिवाय कलिंगडाचा बाह्य रंग हिरवा असला तरी ज्या कलिंगडावर पिवळा डाग दिसेल ते नैसर्गिक रित्या वाढ झालेले आहे असे समजावे! कारण वेलीवरून पडल्याने कलिंगडाला पिवळसर रंग येतो. 
        दुसरी गोष्ट म्हणजे कलिंगड चिरल्यावर लाल भागाचा एक तुकडा पाण्याच्या भांड्यात टाकून बघावा किंवा टिश्यू पेपर लावून पाहावा. लाल रंग उतरला नाही तर ते फळ नैर्सर्गिक रित्या वाढ झालेले आहे याची खात्री करून घेता येते. 
       पुढच्या वेळी कलिंगड खरेदी करताना या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, जेणेकरून पैसे तर वाया जाणार नाहीच, शिवाय उन्हाळ्यात थंडगार आणि गोड फळाचा आस्वादही घेता येईल!
     🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉
       

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...