• रामभक्तांकरिता १० हजार शुगर मीटरचे वितरण
• यश ओमप्रकाश सावल यांचा स्तुत्य उपक्रम
अकोला - रामनवमीचे अवचित्य साधून अकोल्यातील सर्व राम भक्तांना तसेच सर्व नागरिकांकरिता मोफत शुगर रक्त तपासणी यंत्र , रक्त तपासणी करून शुगर यंत्र दहा हजार वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष यश ओमप्रकाश सावंल यांनी आयोजित केलेल्या या शिबिराला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नागरिकांना हे यंत्र मोफत दिल्या गेले असून दहा हजार शुगर तपासणी यंत्र मोफत दिले .
श्याम के दिवाने व गांधी चौक नवदुर्ग उत्सव मंडळ मित्र मंडळ यांच्या सहकार्याने हा सोहळा संपन्न झाला यावेळी माजी नगरसेवक दिलीप देशमुख, अरुण शर्मा, संजय अग्रवाल, ब्युरोर कंपनीचे रिप्रेझेंटिव्ह जगदीश खाजोणे, अपर्णा गावंडे.सुमित शर्मा, अंड. सौरभ शर्मा, जुगल खंडेलवाल कल्पेश खंडेलवाल, अश्विन शर्मा मनीष शर्मा, विकी तिवारी, कृष्णा शर्मा, अनिल मालगे, यांच्यासह दोन्ही विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाचे आयोजन यश ओमप्रकाश सावल कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अकोला महानगर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा