मुख्य सामग्रीवर वगळा

 

•  गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने बेसिक ग्रेव्ही मेकिंग कार्यशाळा 



 अकोला : स्थानिक शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने एकदिवसीय बेसिक ग्रेव्ही मेकिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण प्रसारक मंडळ अकोलाच्या सदस्य रेखाताई खंडेलवाल, मनालीताई गुप्ता उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जगदीश साबू, कलाशाखा प्रमुख प्रा.डॉ. शिवाजी नागरे, डॉ. आरती देशपांडे, डॉ.अरुण शेळके यांची उपस्थिती लाभली. या कार्यशाळेत कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. प्रिया आंदुलकर, प्रा.पूजा गावंडे यांच्या मार्गदर्शनात तीन वेगवेगळ्या रंग प्रकारात बेसिक ग्रेव्ही बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. 



     विद्यार्थ्यांनी बनविलेल्या ग्रेव्ही ची स्पर्धा यावेळी संपन्न झाली. शेवटी बक्षीस वितरण समारंभात मनालीताई गुप्ता यांनी विद्यार्थिनींना किचन रेसिपीज याविषयी मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी विद्यार्थिनींनी क्लाऊड किचन या संकल्पनेमध्ये स्वतःला ऑनलाईन रजिस्टर केले पाहिजे. जेणेकरून घरी बसून आपण विविध पदार्थ बनवून ते लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. हा व्यवसाय मोठमोठ्या शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. या माध्यमातून आपल्याला चांगली मिळकत करता येऊ शकते असे प्रतिपादन केले. रेखाताई खंडेलवाल यांनी सुद्धा विद्यार्थीनीना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.जगदीश साबू यांनी विद्यार्थीनीना हायजिनिक पदार्थ बनवून आपण आपल्या कुटुंबाचे स्वास्थ उत्तम राखू शकतात, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार डॉ.शिवाजी नागरे यांनी केले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...