संत कान्होपात्रा व गुपित आनंदाचे पुस्तकांचे प्रकाशन संपन्न
अकोला/पुणे : बालभारतीचे इतिहास विभागाचे माजी अधिकारी व लेखक मोगल जाधव व अकोल्याचे स्तंभलेखक डॉ. मोहन खडसे यांच्या संत कान्होपात्रा व गुपित आनंदाचे या पुस्तकांचे प्रकाशन, एका सोहळ्यात थाटात संपन्न झाले. महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई चे माजी अध्यक्ष, सुप्रसिद्ध लेखक डॉ. दामोदर खडसे यांच्या हस्ते, हे प्रकाशन सानंद संपन्न झाले. वीर बाजी पासलकर सभागृह, पुणे येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी विचारपीठावर सुप्रसिद्ध वक्ते डॉ गणेश राऊत व बालभारती अभ्यास मंडळाच्या माजी सदस्या डॉ. शुभांगीनी अत्रे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी आपले विचार व्यक्त करताना पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. दामोदर खडसे यांनी दोन्ही पुस्तकांच्या सामाजिक उपयुक्ततेवर आपले विचार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी दोन्ही पुस्तकांमधील लेखनाचा सविस्तर आढावा घेतला. प्रारंभी दीप प्रज्वलानंतर, संत कानोपात्रा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रकाश कुलकर्णी यांनी स्वागत गीत सादर केले. संत कान्होपात्रा यांच्या काही अभंग व गीतांना कु. शुभ्रा परांजपे हिने सुरेल आवाजात सादर केले. यानंतर संत कान्होपात्रा या पुस्तकाचे लेखक मोगल जाधव व गुपित आनंदाचे या पुस्तकाचे लेखक डॉ.मोहन खडसे, अकोला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोबतच डॉ. गणेश राऊत व डॉ.शुभांगी अत्रे यांनी आपले विचार व्यक्त केले. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध इतिहास विषय तज्ञ डॉ. शिवानी लिमये यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. संगीता गांगुर्डे यांनी व्यक्त केले
यावेळी प्रामुख्याने संत साहित्याचे अभ्यासक कुमार चव्हाण, इतिहास संशोधक डॉ. प्रिया गोहाड, एस्काॅपचे चंद्रकांत रांजणेकर, बालभारतीच्या इतिहास विभागाच्या प्रमुख सौ. वर्षा सरोदे, स्वानंद चे प्रमुख सुरेश महल्ले, महावितरणचे कार्यकारी अभियंता किरण सरोदे, उद्योजक प्रकाश सरनोबत, ज्येष्ठ तबलावादक श्रीकांत एकबोटे, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष लक्षमीकांत भिसे, सहभागी झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा