• श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने भूमिपूजन सोहळा
🔴🔵⚫🔳🔷🔘🔴🔵⚫🔳🔷🔘🔴🔵⚫🔳🔷🔘
🔴🔵⚫🔳🔷🔘🔴🔵⚫🔳🔷🔘🔴🔵⚫🔳🔷🔘
अकोला : शहराच्या गांधी चौक येथे श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने श्रीराम दरबाराच्या सभा मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. हा सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
अकोल्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक परंपरेचे प्रतीक असलेल्या या उत्सव समितीने गेल्या १७ वर्षांपासून श्रीरामनवमीच्या पावन पर्वावर भव्य श्रीराम दरबार साकारला आहे. या भूमिपूजनानंतर भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
याप्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे पाटील, माजी महापौर विजय अग्रवाल, महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, रामप्रकाश मिश्राजी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सतीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक सुनील किनगे, पोलीस निरीक्षक केदार आदी मान्यवर उपस्थित होते.
🔴🔵⚫🔳🔷🔘🔴🔵⚫🔳🔷🔘🔴🔵⚫🔳🔷🔘
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा