दिग्दर्शन क्षेत्रात निलेश जळमकरांनी अकोल्याचे नाव लौकिक केले
- आमदार रणधीर सावरकर
अकोला - दिग्दर्शन क्षेत्रात निलेश जळमकर यांनी अकोल्याचे नाव लौकिक केले असून दिग्दर्शन क्षेत्रात नवीन युवकांना त्यांनी मार्गदर्शन करण्यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन अकोला पूर्वचे लाडके आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रणधीरभाऊ सावरकर यांनी निलेश जलमकार यांच्या शासकीय विश्रामगृह अकोला येथे आयोजित सत्कार समारंभावेळी बोलताना व्यक्त केले. अंबरनाथ अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक परीक्षक पुरस्कार त्यांना जाहीर झाला. त्यानिमित्त अकोला पूर्वचे आमदार यांनी स्थानिक सर्किट हाऊस येथे त्यांचा सत्कार केला यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते विजय अग्रवाल ,निर्माता शत्रुघ्न बिडकर, अनिल मालगे उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा