🔶🔴🔵⚫🔳🔷🔘🔶🔴🔵⚫🔳🔷🔘
• संसदेत 100℅ टक्के उपस्थिती
• खा. अनूप धोत्रे यांचा 16 तास उपस्थित राहून चर्चेत सहभाग
अकोला : अकोलेकरांनी खासदार म्हणून प्रथमच निवडून दिलेले अनूपदादा धोत्रे संसदेत अभ्यासपूर्ण हजेरी देत वक्फ बोर्ड संशोधन बिल आणि मणिपूर चर्चेत सहभाग घेतला. सातत्याने 100 ठक्के हजेरी देवून चर्चेमध्ये सतत 16 तास सभागृहामध्ये उपस्थित राहण्या विक्रम केल्याचे वृत्त आहे.
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अलिकडेच त्यांना शुभ आशीर्वाद दिले. त्यांच्या सुविद्य पत्नी,मुली व मुलगा यांनी नवीदिल्लीत भेट घेवून अलिकडेच आशीर्वाद घेतले.
बालपणीच वडील संजय धोत्रेंकडून मिळालेले राजकारणाचे धडे, अकोलेकरांनी दिलेली साथ आणि ज्येष्ठ भाजपा नेत्यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद पाठीशी असल्याचे अनूप धोत्रे सांगतात.
सभागृहामध्ये होणाऱ्या चर्चेमध्ये कशा पद्धतीने विरोध आणि समर्थन करण्यात येते, याचा समर्थपणे अभ्यास करणारे नेतृत्व खा. अनुप दादा धोत्रे यांनी सतत सोळा तास उपस्थित राहून पक्षाचा आदेशासोबत मतदारांनी दिलेली जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत त्यांनी सतत उपस्थित राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.
ज्येष्ठ नेते व अकोलेकरांनी त्यांचे कौतूक केले आहे. त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे.
🔶🔴🔵⚫🔳🔷🔘🔶🔴🔵⚫🔳🔷🔘
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा