मुख्य सामग्रीवर वगळा

 

•  आयएएस अकादमीद्वारा  कृषीरत्न पुरस्काराची घोषणा

   


•  प्रा. गजानन भारसाकळे पहिल्या पुरस्काराचे मानकरी   

अमरावती: शैक्षणिक तथा सामाजिक कार्य, पर्यावरण तथा  गो सेवा या सर्व क्षेत्रात आपल्या अभिनव तथा संशोधन कार्याने संपूर्ण महाराष्ट्रभर परिचित असलेले दर्यापूरच्या गाडगेबाबा मंडळाचे अध्यक्ष प्रा गजानन भारसाकळे यांना पहिला राज्यस्तरीय डॉ पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार घोषीत झाला आहे . अमरावती येथील सर्व देशभर सुपरिचित असलेल्या आय एस मिशन द्वारा यावर्षी पासून राज्य स्तरीय डॉ भाऊसाहेब देशमुख कृषी रत्न पुरस्कार देण्यात येत आहे .या अनुषंगाने आज या पुरस्काराची आय ए एस मिशनचे संचालक डॉ नरेशचंद्र काठोळे यांनी शिक्षणमहर्षि तथा कृषी रत्न डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 10 एप्रिल या स्मृती दिनाच्या पूर्व संधेला ही घोषणा केली .अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या बाभूळगांव -अकोला येथे सिव्हील इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा गजानन रामकृष्ण भारसाकळे यांना त्यांच्या अष्टपैलू कार्यासाठी विविध सामाजिक व शैक्षणीक संघटना तसेच विद्यापीठ व शासकीय पुरस्कारांनी वेळो वेळी सन्मानित करण्यात आलेले आहे .कृषी क्षेत्राशी अंत्यत निगडीत असलेल्या गो सेवा व त्याद्वारे विविध संशोधनपर कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आहे . प्रा भारसाकळे यांनी गाईच्या शेणाची गोवरी एक उर्जास्त्रोत , शेण व पालापाचोळा तथा जनावरांच्या गोठ्यातील वाया गेलोला चारा यापासून विशिष्ट प्रकारच्या कॉम्पोस्ट खताची निर्मिती केलेली आहे . तसेच लम्पी या जनावरांच्या आजारावर त्यांनी ओली हळद यापासून यशस्वी औषधी निर्मिती सुद्धा तयार केलेली आहे . या सर्व विषयांवर त्यांचे मुंबई येथील केंद्रशासनाच्या कार्यालयात पेंटेंट मिळण्यास्तव अर्ज सादर आहेत . यावर आधारीत विषयांवर त्यांचे आजवर तीन आंतरराष्ट्रीय जनरल मध्ये पेपर सुद्धा प्रसिद्ध झालेले आहे .मिशन आय ए एस अमरावती यांच्या आज घोषीत या राज्यस्तरीय पहिल्या पुरस्काराने त्यांच्या आजवर प्राप्त पुरस्कारात भर पडली आहे .येत्या 1मे या महाराष्ट्र दिनी वितरीत केल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबाबत त्यांचे स्व दादासाहेब काळमेघ प्रतिष्ठान अमरावती, अमरावती जिल्हा भारत कृषक समाज ,  गाडगेबाबा मंडळ दर्यापूर, डॉ पंजाबराव देशमुख विचारमंच दर्यापूर , गाडगेबाबा गोरक्षण संस्था माहुली ( धांडे ) , माजी विद्यार्थी संघटना अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय अकोला , गार्डन क्लब दर्यापूर तथा ग्रामपंचायत बेलोरा यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे .

               प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे,                     संचालक,  डाॕ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी अमरावती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...