मुख्य सामग्रीवर वगळा

 




•  लोकरंग अकोल्याच्या कला-संस्कृतीचा आधार बनेल 

•  अभिनेते भारत गणेशपुरे यांचे लोकरंग उदघाटन सोहळ्यात उद्गार



•  लोकरंग द्वारा आयोजित पहिलाच कार्यक्रम हाऊसफुल....


अकोला - गेल्या पन्नास वर्षात अकोल्यात कला क्षेत्रात खूप उलाढाली झाल्यात मात्र त्याची गती मंद दिसते. लोकरंग या सांस्कृतिक समूहाने ही उणीव भरून काढावी या हेतूने हा समूह कार्यरत राहणार असून अकोल्याच्या कला-संस्कृतीचा आधार बनेल असे उद्गार मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी शुक्रवारी येथे  काढले. 
      स्थानिक प्रमिलाताई ओक सभागृहात  शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी  लोकरंग सांस्कृतिक समूहाचे उदघाटन भारत गणेशपुरे यांच्या हस्ते झाले. यावेळी अभिनेत्री मधुरा वेलणकर, लोकरंग अध्यक्ष अनिल गावंडे, डॉ. गजानन नारे, अशोक ढेरे, प्रदीपसिंह राजपूत, किशोर बळी, अरविंद देठे, नीरज आवंडेकर, डॉ. संदीप चव्हाण, अविनाश परळीकर, महेंद्र कवीश्वर, डॉ. राजेंद्र सोनोने, शरद वानखडे, पुरुषोत्तम आवारे पाटील, गजानन घोंगडे, अनिल माहोरे, श्रीकांत पागृत, ॲड. सुधाकर खुमकर उपस्थित होते.     अकोला जिल्ह्यात सिनेमाचे चित्रीकरण होईल अशी अनेक स्थळे आहेत आणि प्रचंड क्षमता असणारे कलावंत सुद्धा आहेत. मात्र त्यासाठी सर्वानी एकत्र येत काहीतरी करण्याची गरज आहे, लोकरंग त्यासाठी पुढाकार नक्कीच घेईल, केवळ इव्हेन्ट न करता या समूहाद्वारे अभिनय कार्यशाळा आणि चित्रपट क्षेत्राला लागणारे मनुष्यबळ कसे पुरवता येईल याचाही विचार करेल असेही भारत गणेशपुरे यावेळी म्हणाले. गेल्या पन्नास वर्षात या शहरात पर्यायी नाट्यगृह उभे राहू शकले नाही, सगळेकाही सरकार करीत नसते, आपणही पुढाकार घ्यायला हवा, लोकांचे सहकार्य असले तर लोकरंग आगामी काळात या शहरात अत्याधुनिक नाट्यगृहाची शुद्ध उभारणी करेल असेही ते म्हणाले. 


लोकरंग समूहाचे अध्यक्ष अनिल गावंडे

लोकरंग समूहाचे अध्यक्ष अनिल गावंडे यांनी लोकरंग मागील भूमिका सांगताना दहा हजार अनामत आणि पाच हजार वार्षिक सदस्यता शुल्क घेऊन या समूहात कुणालाही सहभागी होता येईल,वर्षातून पाच दर्जेदार कार्यक्रम देण्यासोबतच वऱ्हाडी खाद्यमहोत्सव आणि दरवर्षी कलावंतांचा सन्मान केला जाणार असल्याचे त्यानी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन ॲड. वल्लभ नारे यांनी केले तर आभार सुधाकर खुमकर यांनी मानले. 

  लोकरंग सन्मान 

 यावेळी अभिनेते भारत गणेशपुरे यांचा पहिला लोकरंग सन्मान पुरस्कार देऊन अभिनेत्री मधुरा वेलणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे सुधाकर खुमकर यांनी वाचन केले. वऱ्हाडी भाषेचा झेंडा सात समुद्रापार नेण्याच्या कार्यासाठी गणेशपुरे याना हा पुरस्कार देण्यात आला. 

     बोरू ते ब्लॉग प्रयोग 

 लोकरंग समूहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने अभिनेत्री मधुरा वेलणकर अभिनित ' मधुरव : बोरू ते ब्लॉग ' हा नाट्याविष्कार यावेळी सादर करण्यात आला. दोन तासांच्या या प्रयोगात मराठी भाषेचा प्रवास आणि परंपरेचा आढावा यातून अतिशय सुंदरपणे घेण्यात आला. लोकरंगचा पहिलाच कार्यक्रम हाउसफुल झाला होता. कार्यक्रम संपल्यानंतरही कोणी उठायला तयार नव्हते, असे उत्कृष्ट सादरीकरण यावेळी करण्यात आले. नीटनेटक्या आयोजनाबद्दल रसिक श्रोत्यांनी लोकरंग टीमचे आभार मानले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...