मुख्य सामग्रीवर वगळा

•  छावा संघटनेच्या शिबिरात 

•  75 गावकऱ्यांनी केले रक्तदान 



 अकोला :  येथून जवळच असलेल्या तांदळी येथे  छावा  संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 75 गावकऱ्यांनी  रक्तदान करून आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले . सध्या रक्तदानाची अत्यावश्यक गरज लक्षात घेऊन  छावा संघटनेतर्फे रक्तदान शिबिरांवर विशेष भर देण्यात येत असतो. त्यानुसार छावाचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे यांच्या पुढाकाराने  सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  प्रत्येक वर्षी 14 मे रोजी छावा संघटनेतर्फे छत्रपती संभाजी राजे यांची जयंती भव्य प्रमाणात विविध कार्यक्रमासह साजरी करण्यात येत असते. या कार्यक्रमाची जनजागृती करण्याच्या हेतूने व युवकांचा उत्साह वाढविण्याकरिता  छावा संघटनेतर्फे एक महिना आधीपासून ग्रामीण भागात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार तांदळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या विविध कार्यक्रमांसाठी शंकरराव वाकोडे यांचे नेतृत्वाखाली छावाचे जेष्ठ मार्गदर्शक  डॉ. दीपक मोरे, डॉ. श्रीराम लाहोळे, डॉ. संजय सरोदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, अरविंद कपले, अमोल हिंगणे, निवृत्ती वानखडे,अनिरुद्ध भाजीपाले, बबलू वसु, आशु वानखडे यांचे सह इतरही सर्वच पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत असतात.तांदळी येथे पार पडलेल्या या शिबिरात अतिशय उत्साहाने  75 युवकांनी रक्तदान केले. सदर शिबिरात शंकरराव वाकोडे यांचे सह स्त्रियांच्या जिल्हा रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी आप्पासाहेब डामरे, अमोल हिंगणे, आशु वानखेडे पैलवान, डॉ. प्रफुल्ल शिरसाट, वैद्यकीय अधिकारी डॉ. एस पी जोशी, रक्त संकलन अधिकारी  डॉ. खान व त्यांचे सहकारी तसेच भिकाजी धोत्रे, चंद्रकांत अंधारे, गजानन शेंडे, दत्तात्रेय बरडे, शिवलाल पाटील, गोपाल पाटकर, प्रथमेश पाटील, विठ्ठल काळे, मंगेश गाडगे, नितीन वानखडे, सोनू गिरी, शंकर गोळे यांचे सह इतरही गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...