मुख्य सामग्रीवर वगळा

माजी आमदार स्व. तुकारामजी बिडकर स्मृती






•  खेळ विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनवितात. : अमोल मिटकर

•  युवकांनी क्रीडा कौशल्ये आत्मसात करावे : अॕड किरणराव सरनाईक

अकोला : माजी आमदार स्व. तुकारामजी बिडकर स्मृती प्रित्यर्थ कबड्डी असोसिएशन अकोला जिल्हाचे विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कबड्डी (किशोर गट) स्पर्धेचे उदघाट्न विधानपरिषद सदस्य  अमोल मिटकरी यांचे हस्ते संपन्न झाले, प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हनुमान ग्रामविकास प्रतिष्ठान चे कार्याध्यक्ष प्रकाश बिडकर होते तर प्रमुख अतिथी सर्वश्री आमदार किरण सरनाईक,विदर्भ कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष सतीष निखार, विदर्भ सचिव प्रदीप ठाकूर,जिल्हा सचिव सुभाष तायडे, जिल्हा क्रीडाधिकारी सतीश्चंद्र भट,चित्रपट निर्माती राधाताई बिडकर, चित्रपट अभिनेत्री तथा बॉक्सर काजल राऊत, कबड्डी असोसिएशन अकोला चे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर, अमरावती शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रा. सदाशिव शेळके, दिपक बिरकड, शिवसेना युवा नेते योगेश अग्रवाल आदींची उपस्थिती होती.

       यावेळी,बोलतांना खेळाचे कौशल्य मुलांना सर्वागुणसंपन्न, निर्णयक्षम आणि सक्षम पिढी घडविण्यासाठी उपयुक्त ठरतात असे प्रतिपादन स्पर्धेचे उदघाटक अमोल मिटकरी यांनी केले तर विद्यार्थ्यांनी खेळात नैपुण्य मिळवून सदर क्षेत्रात भरारी घेण्याचे आवाहन शिक्षक आमदार ऍड किरणराव सरनाईक यांनी केले.प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश्चंद्र भट,अभिनेत्री काजल राऊत, प्रदीप ठाकूर, आदींनी विचार व्यक्त केले.

         राज्यस्तरीय कबड्डी (कुमार गट) स्पर्धेसाठी विदर्भातून गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा,अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती आदी जिल्ह्यातील  संघ व प्रशिक्षक दाखल झाले असुन त्यांचे जंगी स्वागत आयोजकांनी केले. 

          स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा कबड्डी असोसिएशन चे सर्वश्री प्रमोद वानखडे, गजेंद्र काळे, राजेंद्र जळमकर, विश्वास रायबोले, देविदास जवंजाळ, अर्जुन पवार, सिद्धार्थ सिरसाट, नितीन सपकाळ, पवन कुलकर्णी, मुन्ना गौरी तसेच प्राचार्य विलास इंगळे,दिनकर धामणकर, विजय इंगळे,प्रा विजय उजवणे,बबलु तायडे, प्रा कैलास देवबाले, संजय मैद, जगतजीवन पल्हाडे,चक्रधर राऊत, ऋषभ उमाळे, नारायण नवलकर, राजु राठोड,अनिल मालगे, प्रा.अशोक भराड, अक्षय शिनगारे, अंबादास नागे, राजु दहापुते, आदिसह पंच मंडळी, जय बजरंग परिवार व क्रीडाप्रेमीनी सहकार्य केले.

      कार्यक्रमाचे प्रस्ताविक अकोला जिल्हा कबड्डी असोसिएशन चे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी, सूत्रसंचालन गजेंद्र काळे यांनी केले तर आभारप्रदर्शन राजेंद्र जळमकर यांनी केले.कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी अकोल्यातील क्रीडाप्रेमीची विशेष उपस्तिथी होती.स्पर्धेसाठी पंच म्हणून सर्वश्री विजय मोटघरे खुशाल सेवक, पांडुरंग चौधरी, गोविंदा पाल, किसन सोनटक्के, निखिल घुडे, पुरंदास खोबे, संदीप पाचोडे, किरण कोहळे, आनंद पेंटे, रक्षा मालिये, मुभा तुमडे आदिसह त्यांचे सहकारी काम पाहत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...