• गुरव समाज महिला मंडळाचा जागतिक महिलाादिन व रंगोत्सव कार्यक्रम थाटात
अकोला : अकोला गुरव समाज महिला मंडळाच्या वतीने अलिकडेच जुनेशहरातील शिवचरणपेठ येथील प्राचिन शिवचरण महाराज मंदिरातील मंगल सभागृहात जागतिक महिलादिनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला.
याप्रसंगी प्राजक्ता सपकाळ, मिनाक्षी पवार, वर्षा पांडे, सीमा पेटकर, अर्चना दाणेकर, दिपाली जांभेकर, शितल जऊळकर, मनीषा केंदकर, ज्योती नाईक, वनिता केंदारकर, राधिका अंबुलकार, शोभा सपकाळ, सरला पाूरकर, शुभांगी अंबुलकर, सुनिता वाघमारे, भावना जऊळकर, नम्रता केंदारकर, राणी नाचणकर, रश्मी तायडे, अनिता धांडे, सिद्धी अंबुलकर, प्रियंका बेलबाकर, गौरी केंदरकर, प्राची दाणेकर, समय सपकाळ उपस्थित होते.
सर्वप्रथम गुरव समाजाचे संत परमहंस श्री परशराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व श्री शिवचरण महाराजांना वंदन करुन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
यावेळी जागतिक महिलादिनाचे महत्व विषद करुन यंदाचा होलिकोत्सवाचा आनंद रंगोत्सोवाने साजरा करण्यात आला. यावेळी रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लूटण्यात आला, असे प्राजक्ता सपकाळ आणि मिनाक्षी पवार यांनी कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा