मुख्य सामग्रीवर वगळा

लोकसेवा आयोगाचे

डॉ.दिलीप पांढरपट्टे

       डॉ.दिलीप पांढरपट्टे.. 

       एक कुशल प्रशासक

         कविवर्य स्व.सुरेश भटांमुळे अनेक चांगल्या लोकांच्या भेटी झाल्यात. त्यांच्यामुळे काही सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पण भेटी झाल्यात. ती यादी फार मोठी आहे .अमरावतीला विभागीय आयुक्त म्हणून रुजू होणारे  श्री दिलीप पांढरपट्टे यांचा माझा परिचय कविवर्य सुरेश भट व गझल सम्राट श्री भीमराव पांचाळे यांच्यामुळे झाला. अमरावती विभागाला स्व. सुरेश भटांवर नितांत प्रेम करणारे विभागीय आयुक्त अमरावती  विभागाला लाभले होते हे खरंच खरोखरच आमच्या साहित्यिक मित्रमंडळीला आनंदाची पर्वणी होती.

       प्रत्येकाला एक छंद असतो आणि तो छंद नकळत विकसित होत असतो. आय.ए.एस.अधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे हे उत्कृष्ट सनदी अधिकारी आहेतच. पण गझलेच्या क्षेत्रात त्यांचा चांगला नावलौकिक आहे.  कविवर्य सुरेश भट भीमराव पांचाळे आणि दिलीप पांढरपट्टे हे गझलेचे समीकरण आहे .  खरं म्हणजे सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांच्या मागे कामांचा खूप व्याप असतो . पण या शासकीय व्यापातून स्वतःच्या आवडीसाठी स्वतःच्या छंदासाठी प्रत्येक जण जसा जमेल तसा वेळ काढीत असतो.पांढररपट्टे साहेबांनी आपला आवडीचा भाग म्हणून गझलेला समर्पित केले आहे.

     कविवर्य स्व.सुरेश भटांच्या तोंडून अनेक वेळा पांढरपट्टे साहेबांचे नाव निघायचे.   परवा अमरावती जिल्ह्यातील गझल नवाज श्री भीमराव पांचाळे यांच्या  मोर्शी तालुक्यातील आष्टगाव या गावाला अखिल भारतीय गझल संमेलन आयोजित केले होते.   आमचे मित्र व त्या भागाचे तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्याबरोबर मी या कार्यक्रमाला गेलो होतो .

साहेब तेव्हा मुंबईला कार्यरत होते .खरं म्हणजे मुंबईला रमलेली माणसं अमरावतीला यायला उत्सुक नसतात.  किमान नागपूर मिळावे अशी प्रत्येक अधिका-याची इच्छा असते . मोर्शी तालुक्यातील गझलनवाज  भीमराव पांचाळ यांचे आष्टगाव हे छोटेसे गाव.              मोर्शीजवळ असलेले.  त्या गावांमध्ये गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी आपले सगळे गणगोत गोळा केलेले होते .भीमरावांचे गणगोत म्हणजे गझल लिहिणारे .गझलेवर प्रेम करणारे सर्वजण त्यात आले .या कार्यक्रमाला दिलीप पांढरपट्टे साहेब मुंबईवरून स्वतःच्या वाहनाने येऊन आवर्जून उपस्थित राहिले होते. गझलेचा कार्यक्रम आणि पांढरपट्टे साहेबांची उपस्थिती हे समीकरण जुळून आलेले आहे. मागे भीमरावांनी नवी मुंबईच्या परिसरामध्ये गझल संमेलन घेतले होते. त्यावेळेस साहेब धुळ्याला जिल्हाधिकारी होते. 

        जिल्हाधिकाऱ्याच्या मागे कामाचा किती व्याप असतो .पण ते सांभाळूनही त्यांनी नवी मुंबईच्या गझल संमेलनाला आवर्जून उपस्थिती लावली होती.तेव्हा मी त्यांना भेटलो.मी स्व.सुरेश भटांवर कॉफी टेबल बुक तयार करीत आहे .त्याची  प्रत मी तेव्हा त्यांना दाखविली आणि त्यांनी तोंड भरून माझ्या या प्रकल्पाला शुभेच्छा दिल्या आणि हे कॉफी टेबल बुक चांगले तयार केले याबद्दल माझे अभिनंदनही केले .मागे एकदा असेच मी नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथे गेलो होतो.

       सटाण्यावरून धुळे फारच जवळ होते . पांढरपट्टे साहेब तेव्हा धुळ्याला जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. माझा सटाण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मी मुद्दाम धुळ्याला गेलो .साहित्यिक विश्वातील माणसं जेव्हा सनदी अधिकारी होतात तेव्हा प्रशासनाला  भावनेची आत्मियतेची जिव्हाळ्याची चांगली जोड मिळते. मी धुळ्याला गेल्यानंतर साहेब व्यस्तच होते .परंतु आपल्या व्यस्त कार्यक्रमातूनही त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला. चांगले आदरतिथ्यही केले  अमरावती विभागाला कुशल प्रशासक मिळालेला होता.साहेब अमरावती येथे विभागीय आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर सध्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदी कार्यरत आहेत .            साहित्याच्या क्षेत्रात आपला नावलौकिक वाढविणारा गजलेवर मनापासून प्रेम करणारा माणूस आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचत  विराजमान आहेत ही आमच्या सारख्या गजलेवर प्रेम करणाऱ्या साहित्यिक व साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व साहित्यिकांसाठी व रसिकांसाठी तसेच जनतेसाठी अतिशय आनंदाची बाब आहे .

         परवा दिनांक 22 मार्च 2025 रोजी  श्री दिलीप पांढरपट्टे साहेब सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एका पुस्तक प्रकाशन निमित्त आले होते. श्री शिवाजी कॉलेज बार्शी येथे कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र चालवण्यात येते. या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री शेख यांना श्री दिलीप पांढरपट्टे सर हे बार्शीला येणार आहेत असे माहित पडताच त्यांनी श्री पांढरपट्टे यांना संपर्क केला आणि आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना निमंत्रण दिले. 

       साहेब सकारात्मक विचारसरणीचे आहेत .त्यांनी ताबडतोब ते निमंत्रण स्वीकारले व श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या आयोगाच्या श्री दिलीप पांढरपट्टे यांनी बार्शीला येणे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे ही एक ऐतिहासिक गोष्ट विद्यार्थ्यांना एका मोठ्या कर्तव्यदक्ष सनदी अधिकाऱ्याची या निमित्ताने भेट झाली व त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला ही बाब लाख मोलाची ठरली आहे. 

     साहित्याच्या क्षेत्रात तसेच प्रशासनाच्या सेवेत हा माणूस सकारात्मक विचारसरणी ठेवून काम करीत आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून स्वागत. 

             •  डॉ.नरेशचंद्र काठोळे

                          संचालक

                 डॉ. पंजाबराव देशमुख                      अकादमी,अमरावती कॅम्प.                    Mob. No.  9890967003

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...