• भक्ती गीत गायन स्पर्धा संपन्न
• विश्व मांगल्य सभा अकोला शाखेचे आयोजन
अकोला :
आपली संस्कृती व आध्यात्मिकता अबाधित राहावी हा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विश्व मांगल्य सभा अकोला शाखेद्वारे नुकतीच भक्ती गीत व भजन स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत तब्बल ६० ते ६५ युवती - महिलांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला तर विजयी स्पर्धकांना बक्षीस व पुरस्कार वितरण करण्यात आले.
शहरातील गांधी रोडवरील दयानंद सरस्वती एंग्लो वैदिक विद्यालय सभागृहात विश्व मांगल्य सभा अकोला शाखेच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. आपली धार्मिक संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने महिला दिनानिमित्त आगळीवेगळी अशी भक्ती गीत व भजन सादरीकरण स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत ६० ते ६५ युवती व महिलांनी भक्ती गीत व भजनांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून वैजयंती पाठक, परीक्षक डॉ. स्नेहल शेंबेकर, सौ. संतोष माहेश्वरी या होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सौ.स्नेहल जोशी, सौ गीता अंबरखाने, सौ सुमतीताई कसले, सौ वंदनाताई जकाते यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ अश्विनी जकाते यांनी दिला. कार्यक्रमाची रूपरेषा, उद्देश व विश्वमांगल्य सभे बद्दल विस्तृत माहिती आपल्या प्रास्ताविक भाषणात उपाध्यक्ष डॉ. सौ.अनघा देशपांडे यांनी मांडली . संचलन वर्षा हुपेले यांनी केले व आभारप्रदर्शन सौ गिरिजा जहागिरदार यांनी केले. हा कार्यक्रम महानगर अध्यक्ष निशा टावरी, सचिव वर्षा हुपेले यांच्या नेतृत्वात व शुभांगी कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. तसेच कोकिळा पाटील, वंदना जकाते, प्रांजल रायपुरे,अनीता राजगुरे, रंजना बीजवे, संध्या देशपांडे,वृदा अग्निहोत्री,स्वाती जोशी,सरोज जोशी, वर्षा देशमुख, पल्लवी देशपांडे, शोभा जोशी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
यांना मिळाले पारितोषिक :
मराठी गीत प्रकारात प्रथम - तृप्ति गोरे व ईशीता पुराडउपाध्ये, द्वितीय- क्षितिजा मराठे व आकांक्षा करंदीकर, तृतीय - पल्लवी जोशी व पावनी तेल्हारकर यांना तर हिंदी गीत प्रकारातून प्रथम - जया इंगळे व नयना भुतडा, द्वितीय - स्नेहा सोनी व पुजा चांडक, तृतीय - ममता भंडारी व निधी तोष्णीवाल यांना रोख पुरस्कार प्रदान करण्यात आले व भजन साधिका ही उपाधि देत सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रोत्साहन पर स्पर्धक म्हणून सुषमा रेलकर, शर्वरी वाघ, तनिजा माखीजा, ऋग्वेदी कुळकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा