• विवेक तिवारी यांचा युएसमध्ये झाला गौरव
अकोला :
येथील वरिष्ठ फिजीशियन डॉ. प्रेमशंकर तिवारी यांचे नातू तथा छायाचित्रकार हर्ष तिवारी यांचे चिरंजीव विवेक तिवारी यांचा अमेरिका येथे सन्मान करण्यात आला आहे.
विवेक तिवारी हे युएसमध्ये शिक्षण घेत असून त्यांनी युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया, इर्वाईनमध्ये मास्टर्स इन काम्प्यूटर इंजीनियरिंग अभ्यासक्रमात बेस्ट केपस्टोन प्रोजेक्ट अवार्ड विद्यापीठाद्वारे प्रदान करण्यात आला आहे. अभियंता विवेक तिवारी यांनी ऑटोनॉमस रोवर नेविगेशनचे निर्माण केले आहे. त्याचे युएसमध्ये भरपूर कौतुक करण्यात आले आहे. युएस सोबतच भारतात देखील ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. या तरुण अभियंत्याने हा पुरस्कार मिळवित शहराच्या नावलौकीकात भर घातली आहे. यापूर्वीही त्यांचा ठिकठिकाणी गौरव करण्यात आला आहे. सध्या ते अॅमेझॉन कंपनी कॅलिफोर्नियामध्ये रोबोटिक्स इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
-----------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा