• केंद्रशासनाची कान उघडणीकरीता "घंटा नाद" आंदोलन करणार : देवराव पाटील
अकोला : देशातील सर्व विभागीय कार्यालयावर धरणे, घंटानाद तसेच ताला ठोको आंदोलन मोठया प्रमाणात करण्यात येणार असल्याचे देवराव पाटील यांनी म्ह
टले आहे.
त्याचा एक भाग म्हणुन भविष्य निर्वाह निधी विभागीय कार्यालय अकोला येथे घंटानाद आंदोलन आयोजीत केले आहे. कारण प्राव्हीडंट फंडाचे वरिष्ठ अधिकारी पेन्शनरांची व देशाची फसवणुक करीत आहे. सरकार पेन्शनरांकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्य घटनेने दिलेली जबाबदारी टाळत आहेत. त्यामुळे वयोवृध्द पेन्शनरांना आंदोलनाखेरीज मार्ग नाही. पेन्शनरांना ९०००/- पेंन्शन, त्यास महागाई भत्ता, प्रवासात सवलत व संपुर्ण मोफत वैद्यकिय सेवा इत्यादी मागण्या, या आंदोलनातून करण्यात येणार आहे.
पेन्शन वाढणारच आहे, असा प्रचार काही मंडळी युट्युबवरुन करीत आहेत. त्यांचा हेतु सरकारला मदत करण्याचा आहे. हे स्पष्ट आहे. अशा प्रकाराकडे दुर्लक्ष करा व आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन पेन्शनरांना करण्यात आले आहे.
दि. १८ रोजी लोकसभा व राज्यसभा येथे खासदारांनी या प्रश्नी आवाज उठवावा, असे आवाहन करणारी निवेदने देखील स्थानिक पेन्शनर संघटना देत आहेत. तसेच प्रधानमंत्री, अर्थमंत्री, श्रममंत्री, श्रमसचिव, पेन्शन अतिरीक्त आयुक्त व सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी सदस्य यांनाही अखिल भारतीय समन्वय समितीच्या वतीने निवेदन दिले आहेत. तरी पेन्शनरांनी जास्तीस जास्त संख्येने उपस्थित राहुन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन देवराव पाटील, संजु मालोकार, अंबादास भरणे, मुंकुदराव गावंडे, नारायणराव अंधारे, डी. आर. फुरंगे, गोपाल मांडेकर, सरोदे, अंबेरे पि. के. देशमुख, व्ही. ए. देशमुख, वसंतराव उजाळे, केशव काठोळे, रमेश गायकवाड, चंद्रकांत अवचार ईत्यादींनी केले आहे. अशी माहीती नयन गायकवाड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा