मुख्य सामग्रीवर वगळा

ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात




ऊसाचा रस पिण्याचे फायदे

======================

 ऊसाचा रस तुम्ही नेहमी पित असाल. उसाच्या रसाच्या दुकानातील घुंगरांचा आवाज आपल्याला रस पिण्यासाठी खेचून नेत असतो. येता-जाता, रस्त्यांच्या कडेला अनेकदा तुम्ही ऊसाच्या रसाचा आस्वाद घेत असता. पण काही लोकांना गोड आवडत नसल्यामुळे ऊसाचा रस पित नाहीत. आज आम्ही तुम्हाला ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला कोणते फायदे होतात.याबाबत सांगणार आहोत.  हे फायदे वाचून जे ऊसाचा रस पित नाहीत ते लोक सुद्धा ऊसाच्या रसाचं सेवन करतील.

कॅन्सरपासून बचाव

ऊसाच्या रसात पोषक घटक असतात. त्याव्यतिरिक्त यात कॅन्सर होण्यापासून रोखणारे आवश्यक घटक असतात. तसचं किडनी स्टोनच्या समस्येला सुद्धा रोखण्याची क्षमता यात असते. ऊसात एंटी कॅन्सरचे गुण असतात. कॅन्सरच्या लक्षणांना वाढण्यापासून रोखतात. 

किडनी स्टोनपासून बचाव

ऊसाचा रस प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर होते. अनेक डॉक्टारांकडून सुद्धा उसाचा रस पिण्याचा सल्ला  दिला जातो.  ऊसाच्या रसात आम्लीय क्षमता असते. ज्यामुळे जर मुतखडा झाला असेल तर बाहेर पडण्यास मदत होते. मुत्रावाटे हा खडा बाहेर निघत असतो. 

युरिनरी ट्रक इन्फेक्शन होतं कमी

अनेक महिलांना अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्या्च्या पध्दतीत झालेल्या बदलामुळे युरीनरी ट्रॅकचं इन्फेक्शन होत असतं.  ऊसाच्या रसातील ड्युरेटिक गुणांमुळे या प्रकारचं इन्फेक्शन होण्याचा धोका कमी असतो. शिवाय युरीनमध्ये होणारी जळजळ देखील कमी होते.

रक्ताची कमतरता भरून निघते

अनेक लोकांच्या शरीरात  रक्ताची कमतरता असते. काहीवेळा एनीमिया सुद्धा असतो.  या परिस्थितीत लाल पेशी कमी होत असतात. शरीरात रक्ताचे प्रमाण व्यवस्थित ठेवण्यासाठी ऊसाचा रस फायदेशीर ठरत असतो.  तसंच जर तुम्ही व्यायाम करत असाल तर हाडांना मजबूती देण्यासाठी तसंच उर्जा देण्यासाठी ऊसाच्या रसाचे सेवन करणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर यामुळे दातांना इन्फेक्शनपासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत मिळते.

रोगप्रतिकारकशक्ती वाढते

शरीरात पोषक घटकांची कमतरता असल्यामुळे सर्दी, ताप, खोकला यांसारखे आजार वारंवार होत असतात. जर तुम्ही नियमीत ऊसाच्या रसाचे सेवन केलं तर शरीरासाठी चांगलं असेल रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरेल. आजारी पडण्याचं प्रमाण कमी होईल.  शरीरातील उष्णता कमी करून गारवा देण्यासाठी ऊसाच्या रसाचं सेवन करणं गरजेचं आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...