• श्री जितेंद्रदास आनंदकंद महाराज यांची
• पाचदिवसीय श्री शिवमहापुराण कथा राजेश्वरमंदिरात 30 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत
अकोला : अकोला शहरातील विख्यात व मागील कुंभ मेळ्याप्रमाणे याही वर्षी प्रयागराज येथील कुंभमेळामध्ये राज राजेश्वर महाराज यांच्या कृपेने व सर्वाच्या सहकार्याने संपन्न झालेल्या शिवपुराणकथेनंतर आता अकोला येथे राजेश्वर मंदिरात जितेंद्रदास आनंदकंद महाराज यांची पाचदिवसीय श्री शिवमहापुराण कथा 30 मार्च ते 3 एप्रिल पर्यंत सायं 5 ते रात्री 8 वाजे आयोजित करण्यात आली आहे.
तर त्यामध्ये रुद्र स्वाहाकार दि 4 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता व कन्यापूजन सकाळी 10 वाजता आणि 108 ब्राह्मण पूजन-भोजन दुपारी. 12 वाजता नंतर गंगा महाप्रसादी भव्य भंडारा दुपारी. 1 वाजेपासून शुभ आयोजन करण्यात आले आहे.
जितेंद्रदास आनंदकंद महाराज यांच्या अमृतूल्य वाणीतून श्री शिवमहापुराण कथेची संधी उपलब्ध झाली आहे. भविकांनी भगवान शिवाचा कृपा आशिर्वाद प्राप्त करण्याकरिता श्री राजराजेश्वर मंदिरात उपस्थित राहून शिवमहापुराण कथेचे श्रवण करुन आपले जीवन कृतार्थ करावे, असे आवाहन आयोजक विदर्भ आनंद आश्रम, मानस विकास समिति एवं समस्त शिवभक्त अकोला यांनी केले आहे.
ज्या भाविक भक्तांना यजमानरुप सामिल व्हायचे असेल आपणास कोणत्याही प्रकारे सहकार्य करायचे, असेल तर कृपया त्वरित संपर्क करावा मो. 9850766730 - 9834701450 संपूर्ण कार्यक्रम You Tube Live राहील.
https://youtube.com/@jitendradasanandkandmaharaj?si=x9F11Dl2hmS3qGZx
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा