मुख्य सामग्रीवर वगळा

जिल्हाधिका-यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा





•  जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखा

•  आवश्यक तिथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करा

- जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. १८ : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्व यंत्रणांनी सजग राहून कार्यवाही करावी. आवश्यक तिथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. कुठेही अनुचित प्रकार घडत असल्याचे आढळताच वस्तुस्थिती तपासून निष्पक्षपणे कारवाई करावी. नागरिकांमध्ये यंत्रणेबाबत विश्वासार्हता वृद्धिंगत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.नागपूर येथील सामाजिक तणावाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित सर्व यंत्रणांची ऑनलाईन बैठक जिल्हाधिका-यांनी घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार, नगरपालिका मुख्याधिकारी आदी उपस्थित होते. 


जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, नागपूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर अकोल्यात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. विविध मागण्यांची निवेदने देण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक जमा होतात. अशा ठिकाणी खबरदारी घ्यावी. स्थानिक स्तरावर मोर्चे, आंदोलनांना परवानगी देताना मुंबई पोलीस अधिनियमाद्वारे लागू आदेशांचे पालन होईल याची खातरजमा करावी. आवश्यक तिथे कठोर उपाययोजना राबवाव्यात. कोणत्याही धार्मिक स्थळांलगतच्या रस्त्यांवरून आंदोलन, मोर्चे काढू नये. पुढील काळात सण-उत्सव शांततेत पार पडतील याची दक्षता घ्यावी.

 

ते पुढे म्हणाले की, स्थानिक स्तरावर कुठेही अनुचित प्रकार घडत असेल किंवा तसे घडण्याची शक्यता आढळल्यास त्याचवेळी जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्यावे. सायबर पोलीस सेलकडून समाजमाध्यमांचे संनियंत्रण केले जाते. त्यासोबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार स्तरावरही संनियंत्रण व्हावे. माध्यमांना आवश्यक वस्तुनिष्ठ माहिती मिळेल याची दक्षता घ्यावी व संपर्कात राहून माहितीचे आदानप्रदान करावे. गावपातळीवरही चुकीचे संदेश प्रसारित होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अधिका-यांनी या कालावधीत मुख्यालय सोडू नये. विनापरवानगी रजा कुणीही घेऊ नये, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यात रात्रीचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता ‘महावितरण’ने घ्यावी, तसेच सण-उत्सवानिमित्त सार्वजनिक ठिकाणी लावलेले झेंडे आदी बाबी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सणाचे औचित्य संपल्यानंतर तत्काळ हटवाव्यात. आवश्यक तिथे प्रतिबंधात्मक कार्यवाही करा, असे निर्देश त्यांनी दिले.पोलीस अधिक्षक श्री. सिंह म्हणाले की, सोशल मीडिया सेलद्वारे प्रसारित मजकुराचे संनियंत्रण होते. तथापि, सर्व यंत्रणांनीही आपल्या निदर्शनास आलेल्या बाबी तत्काळ कळवाव्यात. सर्व यंत्रणांमध्ये सतत संपर्क व समन्वय ठेवावा. गावपातळीवरील यंत्रणेपर्यंतही याबाबतच्या सूचना तत्काळ प्रसारित केल्या जातील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैष्णवी यांनी सांगितले.

----

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...