मुख्य सामग्रीवर वगळा

संगमेश्वरला संभाजी महाराजांचे स्मारक

 


 •  छावा संघटनेतर्फे शासनाचे आभार

•  छावा संघटनेतर्फे   छत्रपती संभाजी  महाराजांना आदरांजली 

 अकोला : 

नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेचे 

" छावा " संघटनेतर्फे स्वागत करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाचे आभार मानण्यात आले आहेत. संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात संभाजी महाराजांना आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी सर्वानुमते शासनाचे आभार मानण्यात येऊन घोषणा केल्यानुसार छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक तातडीने पूर्ण करावे व खऱ्या अर्थाने महाराजांचा मानसन्मान करावा अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. 1 फेब्रुवारी 1689 रोजी संभाजी महाराजांना अटक करण्यात आली. 9 फेब्रुवारी 1689 रोजी राजाराम महाराजांचे मंचकारोहन करण्यात आले. 1 फेब्रुवारी ते 11 मार्च 1689 हा संभाजी महाराजांच्या जीवनातील चीर वेदनेचा प्रवास होता. शंभुराजांना अटक झाली त्या दिवसापासून त्यांना अनंत यातना देऊन 11 मार्च 1689 रोजी त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. त्यापूर्वी 17 फेब्रुवारी रोजी महाराजांचे डोळे काढण्यात आले. व दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सोबत असलेल्या कवी कलशांची जीभ उपटण्यात आली. एकाकी पडलेल्या, व अनपेक्षित संकटात सापडलेल्या असहाय शंभूराजांनी त्या विकराल स्थितीवरही मात करत मृत्यूलाही जिंकले व ते  " मृत्युंजय " झाले. त्यांच्यासोबतच 11 मार्च रोजी कवी कलशांची ही हत्या करण्यात आली.   शंभूराजांचे स्मारक तयार होत असलेले संगमेश्वर हे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गाव आहे. या तालुक्याचे मुख्यालय संगमेश्वर गावापासून 17  कि. मी. अंतरावर असलेल्या देवरुख येथे आहे. या गावातच संगमेश्वर तालुक्याचे पंचायत समिती कार्यालय आहे.   संभाजी महाराजांच्या या आदरांजली व श्रद्धांजली कार्यक्रमात  " छावा " चे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकोडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे, ज्येष्ठ नेते अरविंद कपले, डॉ. संजय सरोदे, मनोहर मांगटे पाटील, आशु वानखडे पैलवान, अनिरुद्ध भाजीपाले, बबलू वसु, अमोल हिंगणे, दीपक बिहाडे, देवेंद्र मोहकार, गोपाल पाटकर, गोपाल मोरे, सचिन माकोडे, गणेश पारस्कर आदी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...