• प्रा. अर्चना सपकाळ यांचे विचार
अकोला :
आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. घरकाम सांभाळून नोकरी करणाऱ्या महिलांची तारेवरती कसरत सूरू असते. आता घरकामात पुरूषांचा सहभाग वाढवणे आवश्यक आहे. तसेच महिलांनी महिलांची स्रीशक्ती वाढविण्यास मदत करावी, असे शिवाजी महाविध्यालयाच्या प्राध्यापीका अर्चना सपकाळ यांनी विचार व्यक्त केले.
अध्यक्षस्थानी योगगुरू मनोहर इंगळे होते. ते म्हणाले जगाच्या उध्दारासाठी स्रीयांचा वाटाच महत्वाचा आहे. शिवतेज प्रतिष्ठान तर्फे स्थानीक नेहरू पार्क अकोला येथे महिला योग साधकांसाठी महिला दिनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. त्यात मोनीका बालचंदानी, विनोद भसीन, सुक्ष्मा गावंडे व ज्योती सावरकर यांनी आपले विचार व्यक्त केले. सर्वप्रथम सर्व योगसाधीकांना रोज सकाळी योगास हजर रहाणे बाबत गुलाब पुष्पांनी स्वागत करण्यात आले. महिलादिना निमित्य वेलनेस एव्हरचे रणजीत राठोड मॅनेजर, कोमल बालखांडे, अंकीता ठाकरे व रोहीत धावळे यांनी रक्तदाब व वजन यांची टेस्ट घेतली तसेच मेट्रो पॅथॅालॅाजी तर्फे थायरॅाईड व क्लोरोस्टाल चे चेकअप गोपाल सूलताने सुपरवायझर रोहित अडचूरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते करिता अनुराधा इंगळे, वंदना तायडे, लता वाघेला,अरूणा धुमाळे,शितल नालट, सरला कागलीवाल, निर्मला काळे, ज्योती वानखडे, शालीनी राठोड,आदीनी पांडे,स्मिता केडीया, तारा गुप्ता,मंगला भिवरकर, रेखा पागदूणे, वैशाली रावणकर,निर्मला वानखडे, माया जाधव तसेचजसवंतसिंग मल्ली, ॲड. वामन चौधरी,अतूल पळसपगार, शिवतेज इंगळे, पुरुषोत्तम गुप्ता, अशोक बियाणी,संजय मनतकार अरूण देशमूख आदींनी प्रयत्न केले. आभार व संचालन बाळासाहेब काळे यांनी केले.
———————————————
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा