मुख्य सामग्रीवर वगळा

• कवी श्रेष्ठ सुरेश भट यांचे स्मारक अमरावतीला झालेच पाहिजे





 •  सुरेश भट यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मागणी

अमरावती :

 "उष:काल होता होता काळ रात्र झाली, केव्हा तरी पहाटे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या" सारख्या शेकडो गीतांनी मराठी साहित्य अजरामर व समृद्ध करणाऱ्या कवीश्रेष्ठ सुरेश भट यांचा आज स्मृतिदिन. संपूर्ण महाराष्ट्राला कवितेच्या संदर्भात,गझलेच्या संदर्भात,अमूल्य अशी ठेव दिलेली आहे.आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर त्यांचा नावलौकिक आहे. केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने नागपूरला रेशीमबाग परिसरामध्ये अतिशय भव्य दिव्य असे कवी श्रेष्ठ सुरेश भट सभागृह उभारण्यात आले आहे. मात्र त्यांच्या जन्मगावी तसेच भट साहेबांचा बहुतांश काळ ज्या अमरावतीमध्ये गेला त्या अमरावतीमध्ये मात्र सुरेश भटांच्या नावाने कुठलेही भवन, सभागृह, सांस्कृतिक केंद्र एवढेच काय त्यांचे नाव कुठल्या ही रस्त्याला देण्यात आलेले नाही. सुरेश भटांच्या कार्याचा गौरव म्हणून अमरावती महानगरपालिकेने, अमरावती जिल्हा परिषदेने, जिल्हा परिषद प्रशासनाने तसेच अमरावतीचे पालकमंत्री खासदार,आमदार व लोकप्रतिनिधी यांनी  कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांचे स्मारक किंवा त्यांच्या नावाने सभागृह अमरावतीला होण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन सुरेश भटांचे जिवलग मित्र व साहित्य संगम या साहित्यिक संस्थेचे सचिव तसेच सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी आज एका दूरचित्रवाणीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केले आहे.

      ते पुढे म्हणाले की सुरेश भटांचा बराचसा काळ हा अमरावतीला गेलेला आहे. त्यांचे जिवलग मित्र सर्वश्री अरविंद ढवळे डॉ. मोतीलाल राठी,वली सिद्धीकी, रामदास भाई सराफ, दादा इंगळे या त्या लोकांनी सुरेश भटांच्या पडत्या काळात सुरेश भटांना खऱ्या अर्थाने आधार देऊन कवितेच्या क्षेत्रामध्ये समर्थपणे उभे केले आहे. योगायोगाने सुरेश भटा बरोबर दीर्घकाळ राहण्याचा मला अनुभव आहे त्यांचे हे कार्य लक्षात घेता शासनाने या कामी त्वरेने पुढाकार घ्यावा असेही याप्रसंगी त्यांनी आपल्या मुलाखती मध्ये नमूद केले आहे. 

      याप्रसंगी सुप्रसिद्ध मराठी कवी श्री विष्णू सोळंके, राज्यसभा सदस्य खासदार व अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांचे माजी जनसंपर्क अधिकारी श्री रवींद्र दांडगे तसेच सुरेश भट यांचे मित्र व समर्थ ऑप्टिकल्स या प्रतिष्ठानचे संचालक श्री संदीप गोडबोले,एन डी टी वी मराठीचे पत्रकार शुभम बायस्कर आदी  उपस्थित होते. सुरेश भटांची जयंती आणि पुण्यतिथी ही अमरावतीला मोठ्या व भव्य प्रमाणात साजरी करण्यात यावी असा एकमुखी निर्णय आजच्या या प्रसंगी घेण्यात आला. दरम्यान कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांचे बडनेरा रोडवरील भटवाडी येथील निवासस्थानी भेट देण्यात आली. 

      भट परिवारातर्फे श्री ओंकार जोशी यांनी अभ्यागतांचे स्वागत केले. सुरेश भटांचे भव्य स्मारक अमरावतीला व्हावे यासाठी आतापर्यंत पालकमंत्र्यांना तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना वेळोवेळी निवेदन देण्यात आलेले आहे. आता सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन या कामी पुढाकार घ्यावा असे मत याप्रसंगी सर्वांनी व्यक्त केले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...