मुख्य सामग्रीवर वगळा

खा.अनूप धोत्रेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट •



•  खा.अनूप धोत्रेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 

सौ. समीक्षाताई धोत्रे, यशिका, रणविजय, राजनंदनी यांनीसुद्धा घेतले पंतप्रधानांचे आशीर्वाद 

अकोला :  जागतिक नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातील खासदार अनुप धोत्रे यांना आशीर्वाद देऊन राजकीय सामाजिक पारिवारिक विषयावर चर्चा केली. आगे बढो,असे  आशीर्वाद दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज खासदार अनुप धोत्रे यांनी सहकुटूंब भेट घेवून पंतप्रधानांचे आशीर्वाद घेतले.

       अकोला लोकसभा मतदार संघाच्या वतीने तथा समस्त मतदारांच्या वतीने सबका साथ सबका विकास सबका प्रयासाने देशाला सुजलाम सुफलाम करणारे सांस्कृतिक वारसा जतन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व अभिनंदन केले.  अकोला लोकसभा मतदारसंघातील 17 लाख मतदारांच्या वतीने आज त्यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले.



        यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी सौ. समीक्षाताई धोत्रे, कुमारी यशिका, रणविजय, राजनंदनी यांनी सुद्धा पंतप्रधानांचे आशीर्वाद घेतले.  यावेळी पंतप्रधानांनी माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.  अकोला लोकसभा मतदारसंघातील शेतकरी तसेच या मतदारसंघातील  अडचणी बद्दल माहिती घेतली. खासदार अनुप धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघाच्या वतीने पंतप्रधान छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार,  घटना शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने देशाचा कारभार करत आहे.  त्यांना छत्रपती शिवाजी महाराज जागतिक महापुरुष यांची प्रतिमा देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्या आवडीनिवडी बद्दल माहिती घेऊन चर्चा केली.



      यावेळी समीक्षा धोत्रे यांच्या माहेरची सुद्धा माहिती घेतली.  लोकसभेच्या विशेष समस्या जाणून घेतल्या. महाराष्ट्राच्या महायुतीच्या कारभाराचा बद्दल सुद्धा माहिती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशीर्वाद ऊर्जा देणारा सामाजिक आणि राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदार संघाचा विकास करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल. असे खा. अनूप धोत्रे यांनी सांगितले.

      आपल्या परिवाराची व संजयभाऊ धोत्रे यांच्या प्रकृतीची विचारपूस करून पंतप्रधानांनी आगे बढो, असा आशीर्वाद दिला. आशीर्वाद आपल्याला विकास परवाला गती देणारा असल्याची खासदार  धोत्रे यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...