मुख्य सामग्रीवर वगळा

 


••  ईपीएफ-९५ पेन्शनरांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घंटानाद आंदोलन करुन नोंदविला निषेध 

अकोला :- आज ई. पी. एस ९५ पेन्शनरांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने घंटानाद आंदोलन करुनआपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्त भविष्य निर्वाह निधी कार्यालय अकोला यांना सादर केले. आंदोलनात यवतमाळ, पुसद, उमरखेड, वाशीम, बुलढाणा व अकोला येथील पेन्शनरांनी भाग घेवून    आंदोलन यशस्वी केले.
       आंदोलनाला मार्गदर्शन करतांना यवतमाळ येथील परिवहन संघटनेचे सचिव श्री. डि के. भगत, यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून वस्तुस्थितीला धरुन योग्य मार्गदर्शन केले. पुसद येथील ओमप्रकाश चौधरी, उमरखेड येथील के. पी. मुळे यांनी सरकारवर आसूड ओढत यथोचीत मागदर्शन केले. अध्यक्ष देवराव पाटील यांनी सांगितले की, गेली पंधरा वर्षे संघटनेतर्फे आपल्या मागणी करीता रेल रोको, जेल भरो धरणे आंदोलन तसेच रस्ता रोको असे विविध प्रकारचे आंदोनले करुन आपल्या पेन्शन वाढीकरीता प्रयत्न केले. परंतु केंद्र सरकारने नकारात्मक भुमिका घेवुन वेळ काढु धोरण स्विकारले. वास्तविक पाहता आमचे व्याज जरी पेन्शनरांना वितरीत केले तर अवसतन १५९२.४५ येते सन २०२२-२३ मध्ये पेन्शन निधीवर केवळ व्याज ५१९८५.८२ करोड रुपये जमा झाले. परंतु पेन्शनरांना केवळ १४४४४.६० करोड वाटल्या गेली. ही रक्कम जमा झालेल्या व्याजाच्या केवळ २८% आहे. त्यावर्षी पेन्शन घेणाराची संख्या ७५,५८,९१३ होती. जर पुर्ण व्याज पेन्शनरांना पेन्शन म्हणुन दिली असती तर अवसतन ५७३१.४५ मिळाली असती. यामुळे येणारे व्याज व वाटण्यात येणारी रक्कम यात खुप मोठी तफावत आहे. अशी परीस्थिती असतांना ईपीएफओ ऑफीस पेन्शन फंड घाटयात आहे. हे नेहमीच रडगाणं गात असते. आणि केंद्र सरकार त्याला सहकार्य करते. त्यामुळे पेन्शनरांना पेन्शन न वाढण्यात ईपीएफओ ऑफीस जबाबदार आहे. केंद्र सरकार सुध्दा कामगार विरोधी असुन  त्यामुळे हे सरकार पुर्णपणे कामगार व ज्यांनी देशाला अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर केले त्या कास्तकाराच्या सुध्दा विरोधात काम केले. ही निषेदार्ह बाब असल्याचे पाटील यांनी आपल्या भाषणात प्रतिपादन केले
     आंदोलन यशस्वी करण्याकरीता अकोला, अकोट तेल्हारा, बाळापुर पातुर येथील पेन्शनरानी महत्वपुर्ण भुमिका बजावली. संचालन रमेश गायकवाड तर आभार प्रदर्शन गोपाल मांडेकर यांनी केले. 
     यवतमाळ, पुसद, उमरखेड वाशीम बुलढाणा येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या पेन्शनरांची विशेष आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...