मुख्य सामग्रीवर वगळा

यशस्वी उद्योजक

  बी.एस.उर्फ बाप्पू    देशमुख यांच्या एकसष्टीनिमित्ताने


  जिद्द व परिश्रम याची सांगड घालून आपल्या  नाविन्यपूर्ण प्रयोगाने अकोलेकरांना भूरळ घालणारे यशस्वी उद्योजक, समाजसेवी आदरणीय व्यक्तिमत्व  बी.एस. बाप्पु उर्फ बाबुराव साहेबराव देशमुख यांची दिनांक २८ मार्चला २०२५ संध्याकाळी ७ वाजता नेहरु पार्कमध्ये एकसष्टी त्यांच्या परिवाराच्या वतीने मोठ्या धुमधडाक्यात आनंद उत्साहात साजरी होत आहे.                  त्यानिमित्य त्यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न. माणूस म्हटले की स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी जगण्याची धडपड करणारा व्यक्ती म्हणजे माणूस.   आपण समाजामध्ये सगळीकडेच पाहत असतो. परंतु स्वतः सोबतच स्वतःच्या परिवारासोबतच समाज हितासाठी झटणारा, लढणारा, ध्येयवेडा माणूस अकोला शहरांमध्ये राहतो. सुरुवातीला गणेश इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नवीन नवीन प्रयोग करणारे व त्या माध्यमातून वैज्ञानिक पिढी घडवण्याच्या वसा घेतलेले बी.एस .बापू अनेकांनी पाहिले आहे. प्रिंटिंग प्रेस चा व्यवसायाचा सुद्धा त्यांनी अनुभव घेऊन कार्य केले आहे.

      आपला व्यवसाय सांभाळत असताना आपल्या व्यवसाया सोबतच समाज हितासाठी सुद्धा सातत्याने जगणारे व्यक्तिमत्व फार कमी  दिसतात. त्यातील एक व्यक्ती म्हणजे ज्यांना सर्वजन बी. एस. बाप्पू या नावाने  संबोधतात.  ओळखतात.

      माणसाच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात, काही चांगले, काही वाईट ,काही कधीच लक्षात न राहणारे, आणि काही कायमचे मनात घर करणारे ,मनात घर करणारी जी अनेक माणसं जगताना लाभली ,त्यातलेच एक, बी. एस .बापू आहेत. म्हणूनच मला वाटते बापूसाहेब व्यक्तिमत्व आपका शान है हमारी, कर्तुत्व आपका पहचान है हमारी, हीफाजत करना है, जिंदगी की, क्यूकी सासे आपकी, जान है हमारी. अशा सर्वांना आपलेसे वाटणारे व प्रत्येकाच्या अडी अडचणी मध्ये स्वतः सहभागी होऊन समोरच्याला मदतीचे दानत्व देणारे,  त्यासोबत आपला उद्योग व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकीने सातत्याने कार्य करीत असलेले अकोला शहरातील सर्वांचे लाडके "बाप्पू" डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही.           नेहरू पार्कच्या संघर्षानंतर पार्कचा कायापालट करून शहरातील लोकांना आनंद देणारा पार्क तयार करण्याचे काम बाप्पू साहेबांनी अनेक प्रयोग करून  सातत्याने केले. भंगार असलेल्या नेहरू पार्कला वैभव प्राप्त करून त्या  ठिकाणाला क्रांतिकारक चळवळीचे ठिकाण बनवले. 

      अनेक छोटे-मोठे सामाजिक कार्यक्रम ,विविध सामाजिक संस्था संघटनेच्या बैठकी ,कार्यशाळा, योग साधना,  जाहीर सभा या नेहरू पार्क मधून सातत्याने होत असतात व त्या कार्याला बापूंचा नेहमी हात पुढेच असतो. कोणतेही सामाजिक कार्य करण्यासाठी शहरातील कोणी व्यक्ती बापूसाहेबांकडे गेल्यावर वापस आल्याचे मी अजून ऐकले नाही. जो येईल त्याला जमेल तसी मदत कार्य करण्याचे महान कार्य बापूसाहेब अविरतपणे करीत असतात. 

             तसेच या पार्क मधून नवनवीन प्रयोग सातत्याने ते करीत असतात .त्याचा फायदा अकोलेकरांना नेहमीच होत आहे. निसर्ग, विज्ञान , आध्यात्म व प्रयोगशीलता या माध्यमातून लोकांना आनंद देण्याचे कार्य सातत्याने बी एस बापू करीत असतात.  बापूच्या जीवनामध्ये अनेक घटना घडामोडी बदल झालेले आहेत.परंतु त्याला न घाबरता जिद्दीने परिश्रमाने एक पाऊल पुढे टाकण्याचे काम बी.एस. बापू करीत आहेत. प्रगतीची ही वाटचाल सातत्याने चालू आहे. वाडेगाव रोडवर असलेला अविनाश ऍग्रो टुरिझम पार्क व त्यामध्ये जनतेकरिता नवनवीन उपक्रम सातत्याने त्यांचे चालू असता.षत. 

       त्या माध्यमातून लोकांना आनंद देण्याचे कार्य ते सातत्याने करीत आहेत त्या सोबत गणेश इनोव्हेशन, सिम किड्स स्कूल शाळा, असे अनेक दालनाच्या माध्यमातून ते सातत्याने कार्यमग्न असतात. तरीही एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये सामाजिक बांधिलकी त्यांनी कधी सोडली नाही. कोणताही शहरातील सामाजिक उपक्रम ,आंदोलन कार्यक्रम असो बापूसाहेबांची कला ,कसुरी ,योगदान सातत्याने त्या कार्यामध्ये असते. दरवर्षी पंजाबराव देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा सन्मान करण्याचे कार्य सुद्धा ते सातत्याने गेल्या कित्येक वर्षापासून अविरतपणे करीत आहेत. 

      चेहऱ्यावर नेहमी हास्य व दुसऱ्यालाही हास्य देण्याचे कार्य त्यांचे हातून होत असते . विविध सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सातत्याने चालूच आहे. त्यासोबत आपल्या उद्योग व्यवसायाकडे सुद्धा तेवढ्याच ताकदीने ते वेळ देऊन नवनवीन प्रयोग करून नवनिर्मिती करण्याचे कार्य नेहमी करीत असतात . एक यशस्वी उद्योजक, यशस्वी पिता, यशस्वी समाजसेवक अशा अनेक कार्यात त्यांनी यश मिळवू नावलौकिक मिळवली आहे .तरीही आपले प्रत्येक पाऊल जमिनीवर टाकून चालत असतात .लहान असो मोठा असो सर्वांना सोबत घेऊन मानसन्मान ठेवून जीवनामध्ये अनेक उपक्रम ते यशस्वी करीत असतात .

      आपला परिवार एकत्रित ठेवून त्यांच्या प्रगती सोबतच समाजाची सुद्धा प्रगती झाली पाहिजे हा उदात्त दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ते सातत्याने कार्य मग्न असतात. शाहू, फुले ,आंबेडकर, पंजाबराव देशमुख, गाडगेबाबा आदी थोर महापुरुषांच्या विचाराचा वारसा पुढे नेण्याचे कार्य ते सातत्याने आपल्या जीवनामध्ये करीत आहेत. वय ६१ झाल्यावरही अजूनही तरुणाला लाजवेल असा त्यांच्या कार्याचा व्याप मोठा असून त्यामध्ये ते नेहमी कार्यमग्न असतात. आपल्या व्यावसायिक कार्यासोबतच सामाजिक उपक्रम सुद्धा सातत्याने राबवित असतात. अनेक जाती पंथ, पक्ष, संघटना यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना एका माळेत संघटित करण्याचे काम सुद्धा ते सातत्याने करीत असतात.

      अशा सेवाभावी व्यक्तिमत्व असलेल्या बापू साहेबांची "एकसष्ठी" साजरी होताना मनस्वी सर्वांना आनंद होतो आहे. त्यानिमित्ताने त्यांनी केलेल्या सहा दशकांच्या जीवन प्रवास आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. आपणासारख्या अनेकांना  जीव लावणाऱ्या जीवाभावाच्या मित्र मंडळीचे, थोरामोठ्यांचे प्रेम, सहकार्य, आशीर्वाद ठाई ठाई त्यांना लाभले आहे.

      आजही लाभत आहेत. त्याचीच परिपूर्ती म्हणजे बी एस बापू यांची आज पर्यंत ची यशस्वी वाटचाल होय. ही वाटचाल भविष्यातही सुकर व्हावी, आपल्या सर्वांच्या प्रेमाच्या फुलांचा, आशीर्वादाचा बापूसाहेबांवर सदैव वर्षाव व्हावा !  बापू साहेबांना प्रसिद्धी आवडत नाही. ते कधीही प्रसिद्धीच्या मागे लागलेले नाही .तरीपण तुमच्या आमच्या अनेकांच्या जीवनात बदल घडून आणणारे, सातत्याने कार्यमग्न असणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व बापूसाहेब यांचा ६१ वी या सोहळ्या निमित्याने आपण लिहिलं पाहिजे व एक जाणतं नेतृत्व त्यानिमित्ताने समाजासमोर आलं पाहिजे, हा उदात्त दृष्टिकोन ठेवून हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.  हा लेख प्रार्थनीय आहे .हा लेख सर्वांना आवडो ,त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळो या सदिच्छांसह त्यांना या ६१ च्या लाख लाख हार्दिक हार्दिक शुभेच्छा!! 

      तुम जियो हजारो साल, साल के दिन हो कोटी हजार! या मंगलमय दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.!!बी. एस. बाप्पू देशमुख यांचा मोबाईल नंबर 94228 61746 यावर शुभेच्छा देऊन त्यांना शुभेच्छा, प्रेरणा, ताकद देण्याचे काम आपण करावे ही नम्र विनंती.  त्यांच्या या एकसष्ठीचे सस्नेह निमंत्रण त्यांच्या परिवाराने सर्व मित्रमंडळींना दिलेली आहे

आदरणीय बी.एस. बाप्पु उर्फ बाबुराव साहेबराव देशमुख

यांच्या "एकसष्ठी" साजरी करताना मनस्वी सर्वांनाच आनंद होतो आहे. त्यांच्या सहा दशकांच्या जीवन प्रवासात आपणासारख्या जीव लावणाऱ्या जीवाभावाच्या मित्र मंडळीचे, थोरामोठ्यांचे प्रेम, सहकार्य, आशीर्वाद ठाई ठाई लाभले आहेत व आजही लाभत आहेत. त्याचीच परिपूर्ती म्हणजे आज पर्यंत ची यशस्वी वाटचाल. ही वाटचाल भविष्यातही सुकर व्हावी, आपल्या प्रेमाच्या फुलांचा, आशीर्वादाचा  सदैव वर्षाव व्हावा याच सदिच्छेतून या कार्यक्रमाचे हे आयोजन करण्यात आले आहे.

 या सोहळ्यासाठी आपण सर्वांनी अनमोल उपस्थिती प्रार्थनीय आहे. आपल्या सर्वांची वाट बघतोय आपल्या आगमनाची शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ वेळ : सायं ७ ते १० पर्यंत नेहरू पार्क अकोला येथे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती आयोजक कुणाल बाबुराव देशमुख, सुयेश विजयराव पाटील, रोहित गुणवंतराव सरनाईक, साहील खुशालराव देशमुख,सौ. इंदुताई बाबुराव देशमुख,सौ. अश्विनी कुणाल देशमुख सौ. कोमल सुयेश पाटील सौ. वैष्णवी रोहीत सरनाईक,सौ. सुरेखा खु.देशमुख,खुशालराव साहेबराव देशमुख आदींनी उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे.

        •  गजानन हरणे समाजसेवक. खडकी ,अकोला.

     संवाद....9822942623.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...