• खंडेलवाल इंग्लिश स्कूलमध्ये कला प्रदर्शनीचे आयोजन
अकोला: खंडेलवाल इंग्लिश स्कूल, गोडबोले प्लॉट येथे विद्याथ्यींनी तयार केलेल्या चित्रकला प्रदर्शनी २०२५ चे उद्घाटन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागचे राज्य कोषाध्यक्ष प्रकाश चतरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
अकोला जिल्हा परिषद शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक देवानंद मोरे, विजय वाकोडे, मुख्याध्यापिका पूर्वा कुळकर्णी
प्रामुख्याने उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास या दृष्टिकोनातून उद्याचे उत्तम आर्किटेक्चर, इंटेरियर डिझाईनर, टेक्सटाईल डिझायनर, प्रॉडक्ट डिझायनर उत्तम रित्या घडावे हा या मागचा उद्देश होय. प्रदर्शनी मध्ये संकल्पचित्र, वस्तूचित्र, स्थिरचित्र, लेटर डिझाईनिंग पोस्टर डिझाईन, कोलाजवर्क, प्रिंटमेकिंग विषयांच्या कलाकृती समावेश आहे. शाळेचे कलाध्यापक श्री राहुल राठोड यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थी चित्रकृती तयार करतात व त्या कलाप्रदर्शनी चे आयोजन दरवर्षी करण्यात येते.
चतरकर सर यांनी वर्ग ५ ते १० वगीतील विद्यार्थ्यानी कला प्रदर्शनी मध्ये विविध प्रकारच्या कला सादर केल्यात त्या विद्यार्थ्यींचे व्यक्तिगत कौतुक केले. कलाध्यापक राहुल राठोड, शाळेचे वरिष्ठ लिपिक अभय पाठक यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
तसेच संगणक शिक्षक राहुल चतरकर, कुशल पुरणे यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा