मुख्य सामग्रीवर वगळा

उन्हाळ्यांत आहारामध्ये करा 'हे' बदल

उन्हाळा जाईल सुखकर...


•  उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी 

•  असा घ्या  आहार

     दिवसेंदिवस हळूहळू उन्हाच्या तडाख्याचा जोर वाढू लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे आणि उकाड्याने जीव कासावीस होतो. जसजसा उन्हाचा तडाखा वाढू लागतो, तसे थकवा, डिहायड्रेशन, अंगाची लाही लाही होणे, पोटांत जळजळ होणे यासारख्या समस्या सतावू लागतात. उन्हाळयात होणाऱ्या या शारीरिक समस्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केला पाहिजे. खरंतर, प्रत्येक ऋतूनुसार आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत बदल केला पाहिजे

उन्हाळ्यात जर आपण आपल्या आहारात काही आवश्यक बदल केले तर शरीराला थंडावा मिळेल सोबतच आपण दिवसभर उत्साही देखील राहू. उन्हाळ्यात वाढती उष्णता आणि उकाड्याने अनेक शारीरिक समस्या सतावू नये यासाठी या दिवसात आपल्या डाएटमध्ये काही खास बदल केले पाहिजेत. आहारातील अशा बदलांमुळे उन्हाळ्यांत शारीरिक समस्या त्रास न देता आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. 



उन्हाळयात आपल्या आहारात कोणते मुख्य बदल करायला हवेत? 

१. चहा - कॉफी पिणे सोडून नैसर्गिक पेये पिण्यावर अधिक भर द्या :- उन्हाळ्यात जास्त प्रमाणांत चहा, कॉफी पिल्याने शरीराचे नुकसान होते. एवढेच नाही तर जास्त प्रमाणांत चहा - कॉफी प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी चहा - कॉफी ऐवजी, नारळ पाणी, बेल सरबत, कोकम सरबत, लिंबू पाणी आणि सत्तूचे सरबत अशी नैसर्गिक पेय पिण्यावर अधिक भर द्यावा. ही नैसर्गिक पेय शरीराला थंडावा देण्यासोबतच, शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील देण्यास मदत करतात. 



२. दुधाऐवजी दही आणि ताक प्या :- उन्हाळ्यात, दुधाऐवजी दही आणि ताक यांचा आहारात समावेश करा. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असतात, जे पचनसंस्था मजबूत ठेवते आणि शरीराला थंडावा देण्यास मदत करतात. ताकामध्ये इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे डिहायड्रेशन रोखतात आणि पोट हलके ठेवतात. दह्यामध्ये असलेले कॅल्शियम आणि प्रथिने हाडे मजबूत करतात आणि शारीरिक ऊर्जा वाढवण्यास मदत करतात. आपण ताकामध्ये थोडासा पुदिना किंवा काळे मीठ घालून देखील पिऊ शकता, यामुळे दही आणि ताकाची  चव आणि आरोग्यदायी फायदे आणखी वाढतात.

३. साखरयुक्त पेयांपेक्षा फळं - भाज्यांचे ताजे रस प्या :- कॅन किंवा टिन मध्ये पॅकेजिंग केलेले रस आणि थंड पेये पिण्याऐवजी, घरीच तयार केलेल्या ताज्या फळांचा रस बनवा आणि प्या. लिंबू पाणी, टरबूजाचा रस आणि काकडी-लिंबूचे सरबत केवळ उष्णतेपासून आराम देत नाही तर शरीराला हायड्रेट देखील करतात. 

४. मसालेदार - चमचमीत ग्रेव्हीच्या भाज्या खाण्यापेक्षा पचायला हलक्या भाज्या खाव्यात :- उन्हाळ्यात जड आणि मसालेदार अन्नपदार्थ तसेच जड आणि चमचमीत ग्रेव्हीच्या भाज्या खाण्याऐवजी पचायला हलक्या, पाणीदार आणि हिरव्या भाज्या खाव्यात. दुधी, भोपळा, पालक आणि टोमॅटो यांसारख्या भाज्या शरीराला थंडावा देतात आणि पचायलाही सोपे असतात. यामुळे अपचन आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या होत नाहीत. 

५. संध्याकाळच्या ड्राय स्नॅक्सच्या जागी ताजे सॅलॅड - फळं खा :- उन्हाळ्यात, तळलेले अन्न आणि पॅक केलेले स्नॅक्स खाण्याऐवजी, ताजी फळे आणि सॅलॅडला प्राधान्य द्या.काकडी, टोमॅटो, गाजर आणि मुळा यापासून बनवलेले सॅलॅड शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते आणि पोट हलके ठेवते. याव्यतिरिक्त, त्यात फायबर आणि आवश्यक खनिजे असतात, जे पचनसंस्था मजबूत करतात. हिरव्या पालेभाज्या आणि अंकुरलेले कडधान्ये उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. जर तुम्ही सॅलॅडमध्ये लिंबाचा रस आणि दही घातलं तर ते आणखी पौष्टिक बनते. उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी आहारात छोटे बदल करणे महत्त्वाचे आहे. योग्य आहार घेतल्याने तुम्ही फक्त डिहायड्रेशन आणि थकवा टाळू शकत नाही तर तुम्हाला हलके आणि उत्साही देखील वाटेल.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...