मुख्य सामग्रीवर वगळा

समितीत सहभागी होण्याचे आवाहन

 


•  कवीश्रेष्ठ सुरेश भटांचे स्मारक अमरावतीला व्हावे, यासाठी समिती गठीत होणार

अमरावती दि.15 :  आपल्या कवितेने  संपूर्ण महाराष्ट्राला व महाराष्ट्रातील रसिकांना वेड लावणारे कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट यांचे स्मारक अमरावतीला व्हावे, यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न करण्यासाठी एक समिती कविश्रेष्ठ सुरेश भट स्मारक समिती या नावाने गठीत करण्यात येणार आहे. कवीश्रेष्ठ सुरेश भट यांचे स्मारक अमरावतीला व्हावे यासाठी गेल्या पाच वर्षापासून अविरत प्रयत्न सुरू आहेत. पण अद्यापही या प्रयत्नाला यश आले नाही. हा प्रश्न शासन दरबारी लावून घेण्यासाठी एका सर्वव्यापी नागरिक समितीचे गठन करण्याचे ठरविण्यात आले आहे.       

   यापूर्वी पालकमंत्री, मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी निवेदने देण्यात आलेली आहेत. तसेच प्रसिद्धी माध्यमाने देखील ही गोष्ट उचलून धरली आहे. नागपूरच्या धर्तीवर अमरावतीला देखील कवीश्रेष्ठ श्री सुरेश भट यांच्या स्मारक व्हावे, असे येथील साहित्यिक मंडळींना मनोमन वाटते.          योगायोगाने केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस  यांचे घनिष्ठ नाते  संबंध अमरावतीला आहेत. शिवाय कवी श्रेष्ठ सुरेश भट यांचा नावलौकिक त्यांचे स्मारक. होण्याइतकाच मोठा आहे. त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी व शासन दरबारी पाठपुरावा करण्यासाठी एका सर्वव्यापी नागरिक समितीचे गठन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

     ज्यांना या समितीमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपली नावे या समितीचे मुख्य संयोजक व कविश्रेष्ठ श्री सुरेश भटांचे  मित्र प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना 9890967003 या क्रमांकावर पाठवावीत असे आवाहन  प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे. येत्या 15 एप्रिल रोजी कवी श्रेष्ठ सुरेश भट यांची जयंती असून त्यानिमित्त देखील आयोजन करण्यात ही समिती निर्णय घेणार आहे. समितीचे अस्थायी कार्यालय तूर्त  प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे जिजाऊ नगर महापौरांच्या बंगल्यासमोर विद्यापीठ रोड अमरावती कॅम्प येथे राहणार असून यास्मारकाला गती येण्याच्या दृष्टिकोनातून लवकरच शहराच्या मध्यभागी नवीन कार्यालय प्रारंभ करण्यात येणार आहे. 

     कवीश्रेष्ठ सुरेश भट यांच्यावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी रसिकांनी या स्मारक समितीमध्ये बहुसंख्येने सहभागी व्हावे,  असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...