• विकासाचा ध्यास घेतलेले खास व्यक्तिमत्त्व...
• आमदार वसंतजी खंडेलवाल...!
अकोला- बुलडाणा- वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या वसंतजी खंडेलवाल यांनी आपल्या आमदारकीच्या अगदी सुरुवातीच्या काळातच विकासाचे अनेक विषय मार्गी लावून आपली विकासकामातील भरारी स्पष्ट केली आहे. विकासाचा ध्यास घेतलेल्या या व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या निमित्ताने कोटी कोटी शुभेच्छा.....
अकोला, बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांच्या मतदारसंघात आमदारकीच्या वर्षांपूर्तीलाच जवळपास 100 कोटींचा निधी खेचून आणत खंडेलवाल यांनी आमदारकीची दमदार सुरुवात केली. आता तीन वर्षात हा आकडा खूप वर पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीनजी गडकरी यांचे खास विश्वासू असल्याचा फायदा आमदार खंडेलवाल यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी करून घेतला. तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मूलभूत समस्या मार्गी लावतांना तरुणांना रोजगार मिळावा, व्यापार उद्योग वाढीस लागावेत यासाठी त्यांनी थेट केंद्रीय उद्योग मंत्र्यासोबत चर्चा करून त्यासंदर्भातील कार्यशाळा घेतल्या. अकोल्यातील एमआयडीसी परिसरात मल्टी मॉडेल लॉजेस्टिक पार्क उभारण्यासाठी सध्या त्यांची धडपड सुरू आहे. केवळ बोलाची कढी... न करता प्रत्यक्ष काम करण्यावर त्यांचा भर आहे.
शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे म्हणून नदी नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकणाचा खास कार्यक्रम भाऊंनी हाती घेतला आहे. जलसंधारणाच्या कामांशी रस्ता कामांची सांगड घालत त्यांनी दुहेरी पद्धतीने विकास साधला आहे. रस्ते, पूल, उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्ग हे तर त्यांचे खास आवडीचे विषय. अकोल्यातील उड्डाणपुलांसह अनेक पोच रस्त्यांचा प्रलंबित विषय मार्गी लावल्याने नागरिकांची चांगली सोय झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायती, जिल्हा परिषदांचे सर्व सन्माननीय सदस्य, पंचायत समित्यांचे सभापती या सर्वांच्या समस्या, प्रश्न आमदार खंडेलवाल बारकाईने समजून घेतात आणि लगेच त्या सोडवितातही. तिन्ही जिल्ह्यातील या सन्माननीय सदस्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यासाठी त्यांचे जनसंपर्क कार्यालय सदैव तत्पर असते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून राबवावयाच्या राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांचा ते सातत्याने पाठपुरावा करतात. अकोल्यातील रस्ते प्रशस्त होण्याबरोबरच शहराचे सौंदर्यीकरण, रस्त्याच्या मधोमध वृक्षारोपण यावरही त्यांनी भर दिला आहे. विकासाची गती वाढवायची असेल तर दळणवळणाची चांगली सोय आवश्यक असते. त्यासाठी अकोल्यातील बस स्थानक, रेल्वे स्टेशन आणि विमानतळ या सर्वांचा कायापालट करण्यासाठी त्यांनी विशेष पुढाकार घेतलेला आहे. लवकरच या सर्वांचे रूप आमूलाग्र बदललेले बघावयास मिळणार आहे. अधिकाऱ्यांसोबत अतिशय नम्रपणे वागून त्यांच्याकडून काम करून घेण्याची त्यांची पद्धत वाखाणण्याजोगी आहे. या नम्रपणाने काम होत नसेल तर मग आक्रमक होऊन कसे काम करावे लागते हे सुद्धा अनेकांनी अनेक प्रकरणांमध्ये अनुभवले आहे.
विकासात्मक कामांबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्राचाही त्यांना विशेष लळा आहे. त्यातूनच विविध प्रकल्प मार्गी लागत आहेत. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत आगळीवेगळी अशी आहे. उद्योग व्यवसायाचा प्रचंड व्याप, लोकप्रतिनिधी या नात्याने सर्वत्र द्यावा लागणारा वेळ, पक्षासाठी प्रसंगी पायाला भिंगरी बांधून सर्वत्र फिरण्याची तयारी आणि एवढ्या सगळ्या व्यस्ततेतही आपला मित्रपरिवार आणि कुटुंबालाही तेवढाच वेळ देणारे भाऊ तेवढेच कुटुंबवत्सलही आहेत. एवढे सगळे करूनही प्रसिद्धीचा हव्यास न ठेवणाऱ्या भाऊंना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
: लेखक :
ॲड. सुधाकर खुमकर
( ११ मार्च २०२५ )
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा