• ‘जनसेवा’ पाणपोईचे लोकार्पण
• माजी महापौर सुरेश पाटील यांचा उपक्रम
अकोला :
शहराचे माजी महापौर सुरेश पाटील यांच्या वतीने दरवर्षी रेल्वेस्थानक परिसरात सर्वसामान्य नागरिकांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पाणपोई लावण्यात येते. यंदाही ही ‘जनसेवा’ पाणपाई लावण्यात आली असून सोमवारी (दि. 17) या पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.
रेल्वे स्थानकानजीक वाहनतळाजवळ माजी महापौर सुरेश पाटील यांच्या हस्ते या पाणपोईचा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी थंड पाण्याची कॅन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. उन्हाळ्यातील नागरिकांची गरज ओळखून दिवसभर येथे अनेक थंड पाण्याच्या कॅन ठेवण्यात येतात. हे कॅनचे थंड पाणी सर्व नागरिकांसाठी मोफत उपलब्ध असून दिवसभर गरजेनुसार कॅनचा पुरवठा जनसेवा पाणपोईत केला जातो. या उपक्रमाविषयी सांगताना सुरेश पाटील म्हणाले, की दररोज रेल्वेस्थानक परिसरात हजारो प्रवाशी येतात. त्यापैकी अनेक जण थंड पाण्याची बॉटल खरेदी करु शकत नाही. त्यांचेकरीता ही सुविधा केली आहे. येथून अनेक प्रवाशी थंड पाण्याची बॉटल आपल्या प्रवासाकरीता भरुन घेतात. येथे नागरिकांना पाणी पिण्यासोबत आपल्या बॉटल व वॉटरबॅगमध्ये भरुन नेण्याची सुविधा आहे. दरवर्षी नागरिकांचा पाण्यासाठी प्रतिसाद वाढता असून दिवसाला सुमारे 150 कॅन पाणी लागत आहे. यापेक्षा अधिक लागल्यास आणखी कॅन उपलब्ध करुन देण्यात येतील. या पाणपाईच्या उद्घाटनप्रसंगी चेतन पाटील, सुभाष भावरिया, अरुण पवार, योगेश मोयल, अनिल मोटे, राजेश मोरे, सुभाष कावळे, शेखर कराळे, रोशन वाकोडे, सनी पवार, दर्शन निंबेकर, रोहित डोंगरे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा