• 22 व्या राष्ट्रीय महिला संघ बुद्धिबळ स्पर्धेत
• देवांशी गावंडे ची उत्कृष्ट कामगिरी
• वैयक्तिक कांस्य पदका वर कोरले आपले नाव
अकोला :
अहमदाबाद येथे आयोजित 22 व्या राष्ट्रीय महिला संघ बुद्धिबळ चॅम्पियनशिप, अहमदाबाद बुद्धिबळ संघटना, गुजरात बुद्धिबळ संघटना आणि इंडिया चेस फेडरेशन द्वारा आयोजित स्पर्धेमध्ये राष्ट्रीय महिला संघ बुद्धिबळ स्पर्धेत अकोल्यातील देवांशी गावंडे हिने उत्कृष्ट कामगिरी करीत वैयक्तिक कांस्य पदका वर आपले नाव कोरले आहे,
विविध राज्यातून मुले आणि मुली मिळून एकूण 59 संघांकडून 268 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. ही स्पर्धा 5 मार्च 2025 ते 11 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र संघात कु. देवांशी गावंडे अकोला, कु. ईश्वरी जगदाळे सांगली, कु.श्रुती काळे औरंगाबाद आणि कु. श्रेया हिपारगी सांगली या मुलींची निवड झाली होती . संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्व मुलींनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करीत महाराष्ट्र संघाला स्पर्धेमध्ये सहावे स्थान मिळवून महाराष्ट्र राज्याची देशपातळीवर उंची वाढवली आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहावा क्रमांक पटकाविला विशेष करून या स्पर्धेत चमकली ती अकोल्याची बुद्धिबळ पटू कुमारी देवाशी गावंडे हिने शेवटच्या फेरीपर्यंत अपराजित राहून टेबल पॉईंट मध्ये तिसरे स्थान पटकावून कास्यपदकाची कमाई केली. ह्या अगोदर याच वर्षी शालेय बुद्धिबळ स्पर्धेत कोलकत्ता, पश्चिम बंगाल येथे सुद्धा देवांशी गावंडे तिने उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. ती एल आर टी कॉलेज ची विद्यार्थिनी असून तिला क्रीडा शिक्षक श्री पाडलीवार सर व प्राचार्य यांचे नेहमी पाठबळ मिळाले. तिने आपल्या यशाचे श्रेय आपले क्रीडा प्रशिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांना समर्पित केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा